Hardik-Pandya-Bowling 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC: हार्दिकच्या गोलंदाजीवर शास्त्री, धोनी नि विराटची नजर

हार्दिक पांड्याच्या फिटनेसवरून टीम इंडियावर होतेय टीका | Indian Team Selection

विराज भागवत

हार्दिक पांड्याच्या फिटनेसवरून टीम इंडियावर होतेय टीका | Indian Team Selection

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारताच्या संघाचा टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानशी होता. गेल्या १२ सामन्यात अजिंक्य असलेला भारत यंदा मात्र पाकिस्तानकडून दहा गड्यांनी पराभूत झाला. पराभवानंतर भारताच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित झाले. अनेकांनी हार्दिक पांड्या आणि इतर खेळाडूंच्या कामगिरीबद्दल तसेच निवडीवर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आता हार्दिकच्या आणि टीम इंडियासाठी एक खुशखबर आली आहे.

न्यूझीलंड विरूद्ध भारताचा ३१ ऑक्टोबरच्या रविवारी सामना रंगणार आहे. पाकिस्तानच्या संघाने या दोघांनाही पराभूत केल्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात एक चूकही खूप महागात पडू शकते. त्यामुळे भारताचा संघ आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवेल. गेल्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे तो गोलंदाजी करू शकलेला नव्हता. तसेच, IPL च्या दुसऱ्या टप्प्यातही त्याने गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे पुढील सामन्यात त्याला संघात घेतलं जाईल का? आणि तो गोलंदाजी करू शकेल का? याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. असं असताना BCCI ने टीम इंडियाच्या सराव सत्राचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करताना दिसतोय. इतकेच नव्हे तर हार्दिकच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहली, मेंटॉर महेंद्रसिंग धोनी आणि मुख्य कोच रवी शास्त्री नजर ठेवून असल्याचं दिसतंय. तसे काही फोटो BCCI कडून ट्वीट करण्यात आले आहेत. त्यामुळे हार्दिक न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करणार, असं एकंदरीत चित्र आहे.

हार्दिक पांड्याने आतापर्यंत दुखापतीनंतर संघात आल्यानंतर गोलंदाजी केलेली नाही. IPL मध्येही त्याने गोलंदाजी केली नाही. तशातच पाकिस्तान विरूद्ध त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे, सुनील गावसकर यांनी हार्दिकला संघातून बाहेर काढून त्याच्या जागी इशान किशनला संघात स्थान देण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघात न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात काय बदल होतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT