Ind vs Sa t20 world cup final rohit sharma kissed hardik pandya sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

वादाच्या बातम्यांना ब्रेक लावला! वर्ल्डकप पेक्षा मोठं काहीही नाही; रडणाऱ्या हार्दिकला रोहितने मिठी मारून केले किस, Video Viral

मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडल्यापासून रोहित आणि हार्दिक पांड्या यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या

Kiran Mahanavar

T20 World Cup Final 2024 : 17 वर्षे म्हणा, 12 वर्षे म्हणा किंवा 11 वर्षे म्हणा… टीम इंडियाने प्रत्येक दिग्गज खेळाडू आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे.

बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या या फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचे अनेक स्टार्स होते आणि त्यात एक नाव सर्वात खास होते ते म्हणजे हार्दिक पांड्या.

हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात टीम इंडियाला विजय मिळवून दिला आणि तोच या सामन्याचा हिरो ठरला. या विजयानंतर टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू भावूक झाला होता आणि या भावनांच्या प्रवाहात टीमचा कर्णधार रोहित शर्माने असे काही केले की जे सर्वांचे मन जिंकेल.

टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिक पांड्या स्टार स्पोर्ट्सशी बोलत होता आणि त्याच्या मुलाखतीच्या मध्यभागी अचानक कर्णधार रोहित शर्मा आला आणि त्याच्या गालावर किस घेऊन आपला आनंद व्यक्त केला. हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर तो हिट झाला.

मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडल्यापासून रोहित आणि हार्दिक पांड्या यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. पण वर्ल्डकप पेक्षा मोठं काहीही नाही.

हार्दिकने फिरवला सामना

हेनरिक क्लासेन स्फोटक खेळी खेळत होता आणि दक्षिण आफ्रिकेला 24 चेंडूत फक्त 26 धावा हव्या होत्या. येथे हार्दिकने 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर क्लॉसेनची विकेट घेत टीम इंडियासाठी पुनरागमन केले आणि त्यानंतर 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरची विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केला. हार्दिकने 3 षटकात फक्त 20 धावा देत 3 बळी घेतले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 169 धावाच करू शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT