Rishabh Pant Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rishabh Pant: 'डक'वर आऊट होणाऱ्या पंतची लज्जास्पद कामगिरी! टी20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात नोंद झाली विकेट

T20 World Cup 2024 Final: ऋषभ पंत टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शुन्यावर बाद झाला, त्यामुळे त्याच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024 Final, India vs South Africa: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात शनिवारी (२९ जून) अंतिम सामना खेळला जात आहे. बार्बाडोसला होत असलेल्या या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली होती.

भारताने दुसऱ्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर दोन विकेट्स गमावल्या. यामध्ये ऋषभ पंतच्या विकेटचाही समावेश आहे. पंतला शुन्यावरच महाराजने बाद केले. त्यामुळे पंत असा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला, जो टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शुन्यावर बाद झाला.

भारताने यापूर्वी २००७ आणि २०१४ साली टी२९ वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला आहे. मात्र, या दोन्ही अंतिम सामन्यात कोणताच भारतीय फलंदाज शुन्यावर बाद झाला नव्हता.

शनिवारी होत असलेल्या अंतिम सामन्यात भारताने दुसऱ्याच षटकात चौथ्या चेंडूवर रोहित शर्माची विकेट गमावली होती. तो ९ धावांवरच बाद झाला होता. त्यानंतर लगेचच तिसऱ्या क्रमांकावर आलेला ऋषभ पंत बाद भोपळाही न फोडता बाद झाला.

इतकेच नाही, तर पाचव्या षटकात सूर्यकुमार यादव ३ धावांवर बाद झालेला. त्यामुळे ३४ धावांवर ३ विकेट्स अशी भारताची एक वेळ अवस्था होती. पण नंतर भारताचा डाव विराट कोहली आणि अक्षर पटेलने सांभाळला.

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

  • दक्षिण आफ्रिका - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेंड्रिक्स, एडेन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सिन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एन्रिक नॉर्किया, तब्राईझ शाम्सी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

बापरे! राणादाने घटवलं तब्बल २५ किलो वजन, व्यायामाबद्दल बोलताना हार्दिक जोशी म्हणाला...

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

SCROLL FOR NEXT