Virat-Kohli-Batting 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK: 'कॅप्टन कोहली'ची झुंजार खेळी; रचला विश्वविक्रम!

India vs Pakistan : विंडिजच्या ख्रिस गेलला टाकलं मागे

विराज भागवत

India vs Pakistan : विंडिजच्या ख्रिस गेलला टाकलं मागे

India vs Pakistan, T20 World Cup 2021: भारतीय संघाने पाकिस्तान विरूद्धच्या टी२० वर्ल्ड कप सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ बाद १५१ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर भारताला दीडशतक गाठता आले. संघ धावांसाठी झगडत असताना विराटने एक बाजू लावून धरली आणि ५७ धावा केल्या. विराट कोहली रोहित बाद झाल्याने पहिल्याच षटकात मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याने १९ व्या षटकापर्यंत झुंज देत अर्धशतक लगावले. विराट कोहलीने ५ चौकार आणि १ षटकार यांच्या साथीने ४९ चेंडूत ५७ धावा केल्या. त्यासोबतच त्याने एक विश्वविक्रम केला.

भारताच्या डावाच्या सुरूवातीलाच रोहित (०) आणि राहुल (३) स्वस्तात बाद झाले. सूर्यकुमार यादवही ११ धावांवर माघारी गेला. त्यानंतर विराटने ऋषभ पंतला (३९) साथीला घेऊन संघाचा डावाला आकार दिला. विराटच्या या झुंजार खेळीचं चाहत्यांकडून खूप कौतुक करण्यात आलं. विराटने टी२० विश्वचषक स्पर्धेत दहाव्यांदा अर्धशतक किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी केली. आधी सर्वाधिक ९ वेळा ख्रिस गेलने ही किमया साधली होती. पण आज विराटने त्याला मागे टाकत नवा पराक्रम केला.

पाहा त्यापैकी काही ट्विट्स...

त्याच्या व्यतिरिक्त ऋषभ पंतने ३९ धावांची खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. पण इतर फलंदाजांना फारसा प्रभाव करता आला नाही. भारताच्या दमदार फलंदाजी युनिटला रोखण्यात सर्वात मोठा वाटा होता तो पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीचा... त्याने दमदार कामगिरी करत पाकला सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली. (Shaheen Shah Afridi Superb Bowling takes 3 Wickets of Rohit Sharma KL Rahul Virat Kohli IND vs PAK T20 World Cup 2021)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या खिलाडूवृत्तीवर संशय? कर्णधार श्रेयस अय्यर संतापला, दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं?

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Career Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांचे नशीब असते बलवत्तर! कोणतीही परीक्षा एका झटक्यात होतात पास, समाजात मिळवतात मोठं स्थान

Latest Marathi News Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरी प्रकरण दाबण्याचा कोणताही प्रयत्न करू नये - टीएमसी नेते कुणाल घोष

SCROLL FOR NEXT