Rohit Sharma | Team India | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: रोहितच्या रोबो वॉकचा असा शिजला होता प्लॅन, ICC च्या Video ने उघडलं रहस्य

Rohit Sharma Robot Walk: रोहितने वर्ल्ड कप उंचावण्याआधी केलेल्या रोबो वॉकची आयडिया कोणाची? ICC च्या Videoमधून झाला खुलासा

Pranali Kodre

Rohit Sharma Celebration: भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (२९ जून) टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केलं. भारताचे हे दुसऱे टी२० वर्ल्ड कप विजेतेपद आहे. यापूर्वी भारताने २००७ साली टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.

दरम्यान, भारतीय संघाने हे विजेतेपद जिंकल्यानंतर खेळाडूंना विजेते म्हणून मेडल देण्यात आले. यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माकडे टी२० वर्ल्ड कप सोपवण्यात आला. दरम्यान हा वर्ल्ड कप स्विकारण्यासाठी रोहित रोबो वॉक करत आला होता. त्याच्या या रोबो वॉकची बरीच चर्चा झाली.

आता या रोबो वॉकमागची कल्पना कोणाची होती, हे समोर आलं आहे. आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दिसते की जेव्हा खेळाडू मेडल घेण्यासाठी येत होते. तेव्हा कुलदीप यादव रोहितला रोबो वॉक करत येण्याबद्दल सुचवताना दिसत आहे.

यावेळी सूर्यकुमार यादवनेही या संभाषणात भाग घेतल्याचे दिसत आहे. त्यावेळी ते मस्ती करतानाही दिसत आहे. अखेर नंतर ट्रॉफी घेताना रोहितने कुलदीपची कल्पना ऐकल्याचे दिसले आणि त्याने रोबो वॉक करत ट्रॉफी उंचावली.

रोहित एकमेव भारतीय

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रोहित २००७ च्या टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. त्यामुळे तो दोन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.

अंतिम सामन्यात भारताचा विजय

दरम्यान अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT