Rohit-Sharma-Ishan-Kishan-KL-Rahul 
क्रिकेट वर्ल्ड कप

रोहितऐवजी इशान-राहुलने ओपनिंग करावी? माजी क्रिकेटर म्हणतो...

पहिल्या सामन्यात इशानला संघाबाहेर ठेवण्यात आलं होतं

विराज भागवत

पहिल्या सामन्यात इशानला संघाबाहेर ठेवण्यात आलं होतं

IND vs NZ: भारतीय संघाचा न्यूझीलंड विरूद्ध ३१ ऑक्टोबरच्या रविवारी सामना रंगणार आहे. पाकिस्तानच्या संघाने या दोघांनाही पराभूत केल्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात एक चूकही खूप महागात पडू शकते. त्यामुळे भारताचा संघ आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवेल. गेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल स्वस्तात बाद झाल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली. तशातच, रोहितऐवजी इशान किशन आणि राहुलने सलामीला यावे, असा एक मतप्रवाह दिसून आला. त्यावरून इंग्लंडचा माजी कर्णधार माईक अथर्टन याने आपली भूमिका मांडली.

"भारतीय संघाची फलंदाजी पाहणं हे माझ्यासाठी खूपच रोमांचक होतं. इंग्लंडविरूद्धच्या सराव सामन्यात रोहितला विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी इशान किशन आणि लोकेश राहुल चांगले खेळले होते. त्यानंतर रोहितला संघात स्थान मिळणं स्वाभाविकच होतं. पाकिस्तान विरूद्ध भारताने इशान किशनला बाहेर बसवलं होतं. त्याबद्दल काही प्रश्न नक्कीच मनात आहेत. पण महत्त्वाची बाब म्हणजे इशान किशनने राहुलपेक्षा जास्त धावा केल्या असल्या तरी पॉवर प्ले मध्ये रोहित आणि राहुल हे इशा किशनपेक्षा वेगवान धावा करतात. त्यामुळे रोहित आणि राहुल यांनीच सलामीला आलं पाहिजे", असं अथर्टन म्हणाले.

दरम्यान, गेल्या सामन्यानंतर हार्दिकच्या फिटनेसबद्दलही चर्चा रंगली होती. गेल्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे तो गोलंदाजी करू शकलेला नव्हता. तसेच, IPL च्या दुसऱ्या टप्प्यातही त्याने गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे पुढील सामन्यात त्याला संघात घेतलं जाईल का? आणि तो गोलंदाजी करू शकेल का? याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. असं असताना BCCI ने टीम इंडियाच्या सराव सत्राचे काही फोटो पोस्ट केले. त्यात हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करताना दिसला. इतकेच नव्हे तर हार्दिकच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहली, मेंटॉर महेंद्रसिंग धोनी आणि मुख्य कोच रवी शास्त्री नजर ठेवून असल्याचंही दिसलं. त्यासंबंधीचे काही फोटो BCCI कडून ट्विट करण्यात आले होते. त्यामुळे हार्दिक न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करणार, असं एकंदरीत चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT