Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Shubman Gill : दोस्त दोस्त ना रहा... गिलने कर्णधार रोहितला केलं अनफॉलो, मोठं कारण आलं समोर

Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : सध्या अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार सुरू आहे. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये सलग तीन सामने जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.

Kiran Mahanavar

Shubman Gill vs Rohit Sharma : सध्या अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार सुरू आहे. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये सलग तीन सामने जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सुपर-8 स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजला रवाना होईल. त्याचवेळी राखीव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असलेला युवा फलंदाज शुभमन गिल भारतात परतणार असल्याची चर्चा आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमन गिलला अनुशासनहीनतेमुळे भारतात पाठवले जात आहे. रोहित शर्मासोबतच्या त्याच्या मतभेदाच्या चर्चेदरम्यान त्याच्या मायदेशी परतण्यामागचं एक मोठं कारण समोर आलं आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, शुभमन गिल टीम इंडियासोबत जास्त वेळ नव्हता. तो त्याच्या साईड बिझनेसला जास्त वेळ देत होता आणि टीम इंडियासोबत प्रवासही करत नाहीये. 9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान राखीव खेळाडू रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान स्टेडियममध्ये टीम इंडियासोबत होते, परंतु गिल दिसला नाही.

शुभमन गिलने रोहित शर्माला इन्स्टावर केले अनफॉलो

त्याचवेळी, आता शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील मतभेदाच्या बातम्याही समोर येत आहेत. शुभमनने रोहित शर्माला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे बोलले जात आहे. पण, यात किती तथ्य आहे? याची पुष्टी होऊ शकली नाही. दरम्यान, शुभमन गिलसोबत वेगवान गोलंदाज आवेश खानलाही संघातून मुक्त करण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत शुभमन गिल आणि आवेश खान यांना अमेरिकेत ग्रुप स्टेजपर्यंतच संघासोबत राहायचे होते, जे आधीच ठरले होते. यामुळे दोघेही आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर सोडले जातील. सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे उद्यापासून २४ तास दर्शन, ६ किमीपर्यंत दर्शनरांग; आषाढीसाठी खास व्यवस्था

Petrol-Diesel Price: 15 जुलैचे नवे दर जाहीर! कच्चे तेल 15 डॉलरने महागल्यानंतर मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल आता कितीला?

आजचे पंचांग १५ जुलै २०२६! चंद्रदर्शन, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष

Latest Marathi News Update : पनवेल-जेएनपीटी मार्गावर उड्डाणपुलाचा गर्डर कारवर कोसळला

Maharashtra Farmers: पेरलं, पण उगवलंच नाही! बोगस सोयाबीन बियाण्यांनी हजारो शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT