क्रिकेट वर्ल्ड कप

भारताने गुडघे टेकून तर पाकिस्तानने छातीवर हात ठेवून काय संदेश दिला?

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संघातील खेळाडु एका गुडघ्यावर बसलेले दिसले तर पाकिस्तानच्या खेळाडुंनी छातीवर हात ठेवला होता.

टी २० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतावर नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये भारताविरोधात पहिला वहिला विजय नोंदवला. त्यांनी तब्बल १० गडी राखून सामना जिंकत इतिहास घडवला. दरम्यान, या सामन्याआधी भारतीय संघातील खेळाडु एका गुडघ्यावर बसलेले दिसले तर पाकिस्तानच्या खेळाडुंनी छातीवर हात ठेवला होता. यातून दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एक महत्त्वाचा संदेश दिला. वंशभेदाविरोधात लढ्याला दोन्ही देशांनी या कृतीद्वारे पाठिंबा दर्शवला.

याआधी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यातही असंच चित्र पहायला मिळालं होतं. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने म्हटलं होतं की, खेळाडू वंशभेदाविरोधातील आंदोलनाच्या बाजूने आहेत. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर बदल आणण्याासाठी या मोहिमेचा एक भाग बनायला हवं.

गेल्या वर्षी देशांतर्गत मालिकेमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी विंडिजविरोधातील सामन्यात ब्लॅक लाइव्हज मॅटर मोहिमेला पाठिंबा दर्शवला होता. तर टी २० वर्ल्ड कप २०२१ मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्या आधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये खेळाडुंनी वंशवादाविरोधात गुडघ्यावर बसून पाठिंबा दर्शवला होता.

जवळपास दीड वर्षापूर्वी अमेरिकेत अश्वेत जॉर्ज फ्लॉयड याचा पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर जगभरात ब्लॅक लाइव्हज मॅटर मोहिम सुरु झाली होती. जॉर्ज फ्लॉयडला फसवणुकीच्या आरोपाखाली २५ मे २०२० रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तेव्हा पोलिसांनी जॉर्जच्या मानेवर गुडघा टेकून तब्बल नऊ मिनिटे दाब दिला होता. यामुळे जॉर्जचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हिंसाचार उसळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT