Pakistan | USA Cricket  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

युएसएला मिळालं बक्षीस! मात्र सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान 'या' कारणामुळं T20 World Cup 2026 साठी थेट पात्र

T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2026 साठी थेट पात्र ठरणारे 12 संघ निश्चित झाले आहेत.

Pranali Kodre

T20 World Cup 2026: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर-8 फेरीत पोहचणारे आठ संघ निश्चित झाल्यानंतर आता 10 व्या टी20 वर्ल्ड कपसाठी थेट पात्र ठरणारे 12 संघही निश्चित झाले आहेत. 10 वा टी20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये 2026 साली खेळवला जाणार आहे.

दरम्यान, टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतही यावर्षीप्रमाणेच 20 संघ सहभागी होणार आहेत. यातील 12 संघांना थेट प्रवेश मिळणार आहे, तर 8 संघांना क्वालिफायर्स खेळून पात्रता मिळवावी लागणार आहे.

नियमानुसार टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सुपर-8 साठी पात्र ठरलेले सर्व आठ संघांना 2026 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळाली आहे. याशिवाय 2026 स्पर्धेचे यजमान संघ आणि वरील 9 संघांव्यतिरिक्त तीन सर्वोत्तम क्रमवारी असलेले संघांनाही 2026 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळाली आहे.

आता या नियमानुसार टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या सुपर-8 मध्ये भारत, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, बांग्लादेश, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या देशांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे हे आठ संघ 2026 टी20 वर्ल्ड कपला पात्र ठरले आहेत. आता यातील भारत हा यजमान देशही आहे. तसेच श्रीलंकाही यजमान असल्याने ते देखील 2026 टी20 वर्ल्ड कपसाठी थेट पात्र ठरले आहेत.

याशिवाय सध्या आयसीसी टी20 क्रमवारीत सहाव्या क्रमांकावरील न्यूझीलंड, सातव्या क्रमांकावरील पाकिस्तान आणि 11 व्या क्रमांकावरील आयर्लंड हे तीन संघही 2026 टी20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे आता इतर सर्व संघांना 2026 टी20 वर्ल्ड कप खेळायचा असेल, तर क्वालिफिकेशनमधून पात्र ठरावे लागणार आहे.

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरलेले संघ

यजमान संघ - भारत आणि श्रीलंका

टी20 वर्ल्ड कप 2024 सुपर-8 मधून पात्र ठरलेले संघ - अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, बांग्लादेश, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड

आयसीसी टी20 क्रमवारीनुसार पात्र ठरलेले संघ - पाकिस्तान, न्यूझीलंड आणि आयर्लंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''होर्मुझ' आता आम्ही चालवणार'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान, अनेक देशांकडून टोल वसुली करण्याचा मनोदय

Pick Up Scooty Accident : भरधाव पिकअपची स्कुटीला धडक; खिर्डी येथील तरुणाचा मृत्यू, एक जखमी

Pune Crime : बोपदेव घाट अत्याचार प्रकरण; आरोपी घाटात आल्यापासून ते कोणत्या मार्गाने पळून गेल्याची साक्ष नोंदवली

Khamgaon News : खामगावात पॅथॉलॉजीस्‍ट डॉक्‍टरचा संशयास्‍पद मृत्‍यू; शरीरावर आढळल्या जखमा

Manchar Accident : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; एसटीच्या धडकेत अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT