AFGvsPAK  T20 World Cup Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : राशिदची सेंच्युरी अन् गुलबदिनचं 'बॉडी-बिल्डिंग' सेलिब्रेशन

गुलबदिनने बॉडी-बिल्डरच्या तोऱ्यात सेलिब्रेशन साजरे केल्याचे पाहायला मिळाले.

सुशांत जाधव

Afghanistan vs Pakistan : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. मोहम्मद हाफिजच्या रुपात त्याने टी-20 मध्ये शंभरावा बळी मिळवला. गुलबदिनने त्याचा झेल टिपला. मोहम्मद हाफिजचा झेल टिपल्यानंतर गुलबदिनने बॉडी-बिल्डरच्या तोऱ्यात सेलिब्रेशन साजरे केल्याचे पाहायला मिळाले. राशिद खानने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या या पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या विकेट्सचाही समावेश होता. बाबरला त्याने बोल्ड केलं.

पाकिस्तानच्या संघाला रोखण्यासाठी अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने गोलंदाजीचा भन्नाट फॉर्म्युला तयार केला होता. राशिदची षटके त्याने शिल्लक ठेलवली. 11 व्या षटकात नबीने राशिदच्या हाती चेंडू दिला. आपल्या पहिल्याच षटकात त्याने बाबरला चकवा दिला. अंपायरने राशिदच्या पायचितची अपील मान्यही केली होती .पण बाबरचा रिव्ह्यू यशस्वी ठरला. त्यानंतर राशिदने मोहम्मज हाफिज आणि बाबरची विकेट घेतली. आपल्या 4 षटकांच्या कोट्यात त्याने 26 धावा खर्च केल्या.

नबीचा प्लॅन यशस्वी ठरतोय असे चित्र काही वेळ निर्माण झाले होते. बाबरची विकेट पडल्यानंतर नवीन उल हकने शोएब मलिकला माघारी धाडत पाकिस्तान संघाला अडचणीत आणले होते. पण करीम जनतच्या षटकात डाव फिरला. असिफ अलीने या षटकात 4 षटकार खेचले. अफगाणिस्तानने स्पर्धेत दुसरा विजय नोंदवण्याची संधी निर्माण केली होती. याला फिनिशिंग टच देण्यात ते अपयशी ठरले. या पराभवानंतरही अफगाणिस्तानचा संघ सुपर 12 मधील दुसऱ्या गटात पाकिस्तान पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT