Indian Team Semi-Final Match vs England sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

India Team Semi-Final : दक्षिण आफ्रिका की इंग्लंड, सेमी-फायनलमध्ये टीम इंडिया कोणाशी भिडणार? समजून घ्या गणित

Indian Team Semi-Final Match vs England : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांने गट 2 मधून उपांत्य फेरीत एन्ट्री मारली आहे.

Kiran Mahanavar

India vs England T20 World Cup 2024 2nd Semi-final : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांने गट 2 मधून उपांत्य फेरीत एन्ट्री मारली आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी ग्रुप-1 मधून भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत रंगणार आहे.

ग्रुप-1 मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीत जवळपास मजल मारली आहे. जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकला किंवा पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

एकूणच, आतापर्यंत दोन गटातील दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर ग्रुप-1 मध्ये अद्याप कोणत्याही संघाने अधिकृतपणे उपांत्य फेरीत प्रवेश केलेला नाही. मात्र, ग्रुप-1 मधून टीम इंडिया शेवटच्या सेमीफायनलमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना कोणाशी होणार आहे.

सेमी-फायनलमध्ये टीम इंडिया कोणाशी भिडणार?

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकला तर ते त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर राहतील. दोन्ही संघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला तरीही टीम इंडिया आपल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर राहील.

अशा परिस्थितीत उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना ग्रुप-2मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडशी होईल. खरं तर, गट-1 मधील अव्वल संघाचा सामना गट-2 मधील दुस-या क्रमांकावरील संघाशी आणि गट-2 मधील अव्वल संघाचा सामना गट-1 मधील दुसऱ्या संघाशी भिडले, हे आधीच ठरले होते.

ग्रुप-1 मधून भारत आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर भारताचा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. एकंदरीत उपांत्य फेरीत मोठ्या संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 27 जून रोजी खेळला जाणार आहे आणि त्यानंतर 28 जून रोजी अंतिम सामनाही खेळवला जाईल. इंग्लंडने गेल्या वेळी सेमी-फायनलमध्येच टीम इंडियाचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT