T20 World Cup 2024 IND Vs USA Saurabh Netravalkar sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Saurabh Netravalkar : सौरभ नेत्रावळकरने रचला इतिहास! ICC स्पर्धेत असे करणारा पहिला ठरला गोलंदाज

T20 World Cup 2024 IND Vs USA Saurabh Netravalkar : यूएसएचा स्टार वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकरने टीम इंडियाविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. या सामन्यात सौरभ नेत्रावलकरने विराट कोहलीविरुद्ध एक खास विक्रमही केला आहे.

Kiran Mahanavar

Saurabh Netravalkar IND Vs USA T20 World Cup 2024 : यूएसएचा स्टार वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकरने टीम इंडियाविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. या सामन्यात सौरभ नेत्रावलकरने विराट कोहलीविरुद्ध एक खास विक्रमही केला आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. यासह रोहित आणि कंपनी आता सुपर-8 मध्ये पोहोचली आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकला असला तरी पुन्हा एकदा अमेरिकेचा स्टार गोलंदाज सौरभ नेत्रावलकरने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने लाखो क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.

सौरभ नेत्रावळकर ठरला पहिला गोलंदाज

सौरभ नेत्रावळकरने भारताविरुद्ध पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी केली. या सामन्यात सौरभने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची विकेट घेतली. ज्यात सौरभने पहिल्याच चेंडूवर कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

आता आयसीसी स्पर्धेत विराट कोहलीला गोल्डन डकवर बाद करणारा सौरभ पहिला गोलंदाज ठरला आहे. कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच गोल्डन डकवर बाद झाला आहे. या सामन्यात सौरभ नेत्रावळकरने गोलंदाजी करताना 4 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले. या स्पर्धेत सौरभ अप्रतिम गोलंदाजी करत आहे.

टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 20 षटकात 8 गडी गमावून 110 धावा केल्या. टीम इंडियासाठी अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी करत 4 बळी घेतले. यानंतर टीम इंडियाने हे लक्ष्य 18.2 षटकांत पूर्ण केले. भारताकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. याशिवाय शिवम दुबेने 31 धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT