T20 World Cup 2024 Super 8  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC 24 Super 8 : सुपर-8ची शर्यत रोमांच मोडवर! 20 पैकी 11 संघांचा पत्ता कट; आता एका जागेसाठी दोन टीममध्ये टक्कर

T20 World Cup 2024 Super 8 : टी-20 वर्ल्ड कप 2024च्या सुपर-8 मध्ये कोण कोणता संघ जाणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यावेळी वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघांनी भाग घेतला होता.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Super 8 : टी-20 वर्ल्ड कप 2024च्या सुपर-8 मध्ये कोण कोणता संघ जाणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यावेळी वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघांनी भाग घेतला होता. यापैकी फक्त आठ संघच पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर-8 मध्ये प्रवेश करणार आहे.

आतापर्यंत स्पर्धेच्या पुढील टप्प्यात पोहोचणाऱ्या 8 पैकी 7 संघांची नावे निश्चित झाली आहेत. आता उर्वरित 1 जागेसाठी 2 संघांमध्ये लढत होणार आहे. आता सुपर-8 मध्ये पोहोचलेल्या संघांना प्रत्येकी 3 सामने खेळावे लागणार आहेत. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास निश्चित होईल.

सुपर-8मध्ये सात संघांची जागा पक्की

भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, यूएसए यांनी आधीच स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात म्हणजेच सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता इंग्लंडचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचणारा सातवा संघ ठरला आहे.

वर्ल्ड कपमधून 20 पैकी 11 संघांचा पत्ता कट

पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, नेपाळ, युगांडा, पापुआ न्यू गिनी, नामिबिया, ओमान, कॅनडा, स्कॉटलंड आणि आयर्लंड हे संघ स्पर्धेच्या गटातून बाहेर पडले आहेत.

आता एका जागेसाठी दोन टीममध्ये टक्कर

आता फक्त 1 जागेसाठी 2 संघांमध्ये लढत पाहिला मिळणार आहे. यामध्ये बांगलादेश आणि नेदरलँडच्या संघांचा समावेश आहे. बांगलादेशचे गुणतालिकेत 3 सामन्यांतून 4 गुण आहेत आणि ते गटात दुसऱ्या स्थानावर आहेत. तर नेदरलँडचे 3 सामन्यांत 2 गुण आहेत.

जर बांगलादेशने नेपाळविरुद्ध शेवटचा सामना जिंकला तर सुपर-8 गाठणारा तो आठवा संघ बनेल. जर बांगलादेशने हा सामना हारला आणि नेदरलँडने श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर आठवा संघ नेट रन रेटद्वारे निश्चित केला जाईल.

त्याचवेळी नेदरलँडने शेवटचा सामना गमावला तर तो ग्रुप स्टेजमधून बाहेर पडेल आणि बांगलादेशचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP woman leader daughter in law : भाजप महिला नेत्याच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल; अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी, विवाहबाह्य संबंधांचा आरोप

लता मंगेशकरांचं ते अजरामर गाणं, जे गाताना डोळ्यात आले होते अश्रू; 67 वर्षांनंतरही रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ-बहिणीला करतं भावुक!

Ramdas Athawale at Kamathipura : सोलापूर, कर्नाटक ते बंगाल... कामाठीपुऱ्यातील महिलांचं दु:ख जाणून घेत आठवलेंनी साजरा केलं रक्षाबंधन; मुख्य प्रवाहात आणण्याचंही दिलं आश्वासन

Marathi News Live Updates : RSS पथसंचलनात सहभागी झाल्याने दोन शिक्षक निलंबित; एच. डी. कुमारस्वामींचा सरकारला सवाल

Grand Chess Tour: प्रज्ञानंद ठरला 'किंग'! अमेरिकेच्या खेळाडूला धूळ चारत घडवला इतिहास; कोट्यवधींचे बक्षीसीही मिळाले

SCROLL FOR NEXT