Sunil Gavaskar and Wasim Akram Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: जेव्हा गावसकर अन् वसीम अक्रम मैदानातच धरतात DJ वर ठेका, Video होतोय व्हायरल

Sunil Gavaskar - Wasim Akram: टी20 वर्ल्ड कपमधील एका सामन्यादरम्यान सुनील गावसकर आणि वसीम अक्रम हे स्टेडियममध्ये वाजणाऱ्या डीजेवर डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024 Viral Video: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे सुरू आहे. या स्पर्धेत अनेक रोमांचक सामने आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. इतकेच नाही, तर अनेक धक्कादायक निकालही आत्तापर्यंत या स्पर्धेत पाहायला मिळाले आहेत.

याच दरम्यान स्पर्धेदरम्यानचे बरेच बिहाइंड द सीन व्हिडिओ व्हायरल झालेलेही दिसले. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सुनील गावसकर आणि वसीम अक्रम डान्स करताना दिसत आहे. गावसकर आणि अक्रम टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत समालोचक म्हणून काम करत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेदरम्यानचा आहे. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या सामन्यादरम्यानचा आणि कोणत्या मैदानातील आहे, हे स्पष्ट होत नाहीये. मात्र, हा व्हिडिओ न्युयॉर्कमधील नसाऊ काउंटी क्रिकेट मैदानातील असल्याची शक्यता आहे.

कारण भारतीय संघातील खेळाडू आजूबाजूला दिसत आहेत. म्हणजेच भारताच्या एखाद्या सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. भारताने या वर्ल्ड कपमधील पहिले तीन सामने न्युयॉर्कमध्ये खेळले आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसते की मैदानात डिजेवर गाणे वाजत आहे. त्यावर गावसकर यांच्यासह वसीम अक्रमनेही ठेका धरला होता. ते दोघेही नाचण्याचा आनंद घेत असताना स्टेडियममधील प्रेक्षकाने हे दृश्य टीपले असून आता त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने अ गटातून अव्वल क्रमांक मिळवत सुपर-8 फेरीत स्थान पक्के केले आहे. मात्र पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. अ गटातून अमेरिका संघाने दुसरा क्रमांक मिळवत सुपर-8 मधील स्थान पक्के केले आहे.

पाकिस्तानला या स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. याबद्दल अक्रमने संघावर तिखट शब्दात टीकाही केली होती. त्याने म्हटले होते की आता नवा पाकिस्तान संघ उभारण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT