Team India Sakal
Cricket

Team India Schedule: टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर! 'या' दिवशी रंगणार पुणे, मुंबई अन् नागपूरमध्ये महत्त्वाचे सामने

Team India Timetable: बीसीसीआयने 2024-25 हंगामातील टीम इंडियाचे मायदेशातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या हंगामात पुणे, मुंबई आणि नागपूर या शहरांमध्येही सामने होणार आहेत.

Pranali Kodre

Team India Schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे 2024-25 हंगामातील मायदेशातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

बीसीसीआयने दिलेल्या वेळापत्रकानुसार २०२४-२५ या हंगामात बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे तीन संघ पुढील वर्षभरात भारत दौरा करणार आहे.

या दरम्यान पुणे, मुंबई आणि नागपूर या महाराष्ट्रातील तीन शहरांमध्येही काही सामने आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील चाहत्यांनाही आंतरराष्ट्रीय सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याची संधी मिळणार आहे.

पुणे आणि मुंबई येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील कसोटी सामने होणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये २४ ते २८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. तसेच १ ते ५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळला जाणार आहे.

त्यानंतर २०२५ च्या सुरुवातील इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ३१ जानेवारी रोजी पुण्यात टी२० मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार आहे. तसेच २ फेब्रुवारी रोजी टी२० मालिकेतील पाचवा सामना मुंबईत खेळला जाईल. त्यानंतर वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

भारतीय संघाचे 2024-25 हंगामातील मायदेशातील सामन्यांचे वेळापत्रक -

बांगलादेशचा भारत दौरा (2024)

  • कसोटी मालिका (वेळ - स. 6 वाजता)

    • 19 -23 सप्टेंबर - पहिली कसोटी, चेन्नई

    • 27 सप्टेंबर - 1 ऑक्टोबर - दुसरी कसोटी, कानपूर

  • टी20 मालिका (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

    • 6 ऑक्टोबर - पहिला टी20, धरमशाला

    • 9 ऑक्टोबर - दुसरा टी20, दिल्ली

    • 12 ऑक्टोबर - तिसरा टी20, हैदराबाद

न्यूझीलंडचा भारत दौरा (2024)

  • कसोटी मालिका (वेळ - स. 9.30 वाजता)

    • 16 - 20 ऑक्टोबर - पहिली कसोटी, बेंगळुरू

    • 24 - 28 ऑक्टोबर - दुसरी कसोटी, पुणे

    • 1 - 5 नोव्हेंबर - तिसरी कसोटी, मुंबई

इंग्लंडचा भारत दौरा (2025)

  • टी20 मालिका (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

    • 22 जानेवारी - पहिला टी20, चेन्नई

    • 25 जानेवारी - दुसरा टी20, कोलकाता

    • 28 जानेवारी - तिसरा टी20, राजकोट

    • 31 जानेवारी - चौथा टी20, पुणे

    • 2 फेब्रुवारी - पाचवा टी20, मुंबई

  • वनडे मालिका (वेळ - दु. 1.30 वाजता)

    • 6 फेब्रुवारी - पहिला वनडे, नागपूर

    • 9 फेब्रुवारी - दुसरा वनडे, कटक

    • 12 फेब्रुवारी - तिसरा वनडे, अहमदाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT