Shubman Gill Sakal
Cricket

Team India: शुभमन गिल टीम इंडियाचा कॅप्टन! 'या' मालिकेसाठी झाली 15 जणांच्या संघाची घोषणा

Shubman Gill: बीसीसीआयने आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून शुभमन गिलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.

Pranali Kodre

India’s squad for tour of Zimbabwe: बीसीसीआयने झिम्बाब्वे विरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघ जुलैच्या पहिल्या आठवड्यात झिम्बाब्वे दौऱ्यात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी १५ जणांचा संघ भारतीय निवड समीतीने निवडला आहे.

ही मालिका ६ जुलैला चालू होणार असून १४ जुलैला संपणार आहे. म्हणजेच भारतीय संघ टी२० वर्ल्ड कपनंतर लगेचच झिम्बाब्वे दौऱ्यात खेळताना दिसणार आहे. दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्याचे दिसून येत आहे. कारण संघात काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

सध्या चालू असलेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे, तर उपकर्णधारपद हार्दिक पांड्या सांभाळत आहे. मात्र, या दोघांनाही झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे शुभमन गिलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

तसेच या संघात अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, तुषार देशपांडे आणि रियान पराग अशा नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सध्या टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग असलेल्या संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल यांनाही झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

या दौऱ्यात जुलै महिन्यातील दिनांक ६, ७, १०, १३ आणि १४ या दिवशी सामने होणार आहेत. हे सर्व सामने हरारेला होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता चालू होतील.

असा आहे भारतीय संघ - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार , तुषार देशपांडे.

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक (टी२० मालिका) (वेळ - भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्या. ४.३० वाजता)

  • ६ जुलै - पहिला टी२० सामना, हरारे

  • ७ जुलै - दुसरा टी२० सामना, हरारे

  • १० जुलै - तिसरा टी२० सामना, हरारे

  • १३ जुलै - चौथा टी२० सामना, हरारे

  • १४ जुलै - पाचवा टी२० सामना, हरारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

Pune Crime : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार; आजोबाला जन्मठेप

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

SCROLL FOR NEXT