Jaydev Unadkat News sakal
Cricket

Jaydev Unadkat : टीम इंडियात संधी मिळाली नाही म्हणून पठ्ठ्याने घेतला मोठा निर्णय; आता देशात खेळणार सामने

Jaydev Unadkat News : भारतीय संघातून खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण फार कमी खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळते.

Kiran Mahanavar

Jaydev Unadkat News : भारतीय संघातून खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण फार कमी खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळते. टीम इंडियाचा स्टार खेळाडू जयदेव उनाडकटने जुलै 2023 मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळालेली नाही. आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यंदाच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या क्लब ससेक्सकडून शेवटचे पाच सामने खेळणार आहे. तो इंग्लिश भूमीवर खेळताना दिसणार आहे. 32 वर्षीय उनाडकटने गेल्या मोसमात कौंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्सकडून चार सामन्यांत 11 विकेट घेतल्या होत्या.

गेल्या मोसमात, उनाडकटने लीसेस्टरशायरविरुद्ध दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेत आपल्या संघाला 15 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. उनाडकट काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यापूर्वी तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार आहे.

जयदेव उनाडकटने 2010 मध्ये भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले. पण खराब कामगिरीमुळे तो टीम इंडियामध्ये आपले स्थान टिकवू शकला नाही आणि त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 4 कसोटी सामन्यांमध्ये 3 बळी घेतले आहेत.

त्याने टीम इंडियासाठी 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 9 विकेट्स आणि 10 T20I सामन्यात 14 बळी घेतले आहेत. उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रने 2019-20 मध्ये रणजी करंडक जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT