Mohammed Shami Instagram
Cricket

Mohammed Shami: टीम इंडियात लवकरच होणार मॅच विनर गोलंदाजाचं पुनरागमन; सर्जरीनंतर जोरदार सरावाला सुरुवात; Video Viral

Mohammed Shami: मोहम्मद शमीला गेल्या काही महिन्यांपासून शस्त्रक्रियेमुळे क्रिकेटपासून दूर रहावे लागले आहे. पण आता त्याने पुन्हा ट्रेनिंगला सुरुवात केली असून त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

Pranali Kodre

Mohammed Shami: भारतीय क्रिकेट संघ सध्या टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत व्यस्त आहे. अशात भारताचा 33 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमनासाठी मेहनत घेत आहे.

मोहम्मद शमी 2023 वर्ल्ड कपनंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्याला टाचेच्या दुखापतीमुळे गेले 6 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागले आहे. तो भारतासाठी 2023 वर्ल्ड कपमध्ये स्टार परफॉर्मर राहिला होता. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या.

मात्र या स्पर्धेनंतर त्याला टाचेच्या दुखापतीने घेरले, अखेर त्याला फेब्रुवारी 2024 मध्ये शस्त्रक्रिया करावी लागली होती.

त्यामुळे त्याला आयपीएल 2024 स्पर्धा आणि टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेलाही मुकावे लागले आहे. पण या शस्त्रक्रियेनंतर आता तो दुखापतीतून सावरत असून त्याने सरावाला सुरुवात केली आहे.

त्याच्या ट्रेनिंगचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे. त्यामुळे आता लवकरच तो भारतीय संघासही पुनरागमन करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

शमी यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान मायदेशात होणाऱ्या बांगलादेश आणि न्युझीलंड विरुद्धच्या मालिकांमधून भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

याबाबत काहीदिवसांपूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माहिती दिली होती. तसेच या वर्षाच्या अखेरीस भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही जायचे आहे, त्याआधी शमी पूर्ण तंदुरुस्त होऊन या दौऱ्यात खेळण्यासाठी पूर्ण सज्ज असेल, अशी अपेक्षा भारतीय संघालाही असेल.

शमीने त्याच्या कारकिर्दीत 64 कसोटी सामने खेळताना 229 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 101 वनडे सामन्यांमध्ये 195 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय 23 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 24 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

Pune News : जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्ती त्वरित सुरू करा; उच्च न्यायालयाचे आदेश

Raigad River Biodiversity: अंबा नदीत दुर्मिळ अल्बिनो एलीगेटर गार माशांचा सुळसुळाट; थेट बाजारात विक्री, जैवविविधतेला धोका

SCROLL FOR NEXT