Mumbai Police Arrests Hardik Pandya Step Brother News Marathi sakal
Cricket

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या भावाला अटक... फसवणूक अन् पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप

Mumbai Police Arrests Hardik Pandya Step Brother : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक कृणाल पांड्याची फसवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Kiran Mahanavar

Mumbai Police Arrests Hardik Pandya Step Brother : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. हार्दिक आणि कृणाल पांड्या या दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला अटक करण्यात आली आहे. हार्दिकच्या सावत्र भाऊवर 4.3 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

2021 मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता. हार्दिक आणि कृणाल दोघांकडे 40% शेअर्स तर वैभवकडे उर्वरित 20% शेअर्स होते.

पण हार्दिक आणि कृणाल पांड्याला न कळवता त्यांच्या सावत्र भावाने व्यवसायात दुसरी फर्म स्थापन केली. ज्यामुळे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे त्याला पैशांचा गैरवापर तसेच करारातील अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

आयपीएल 2024 च्या आधी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला. यावेळी रोहित शर्माच्या जागी त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. पण मुंबई इंडियन्सच्या योजनेनुसार गोष्टी घडल्या नाहीत. 5 वेळच्या चॅम्पियनची सुरुवात खराब झाली. त्यांनी त्यांचे पहिले 3 सामने गमावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT