Rohit Sharma Not Attend Ambani Wedding Rohit Sharma Not Attend Ambani Wedding
Cricket

Rohit Sharma : राधिका-अनंत अंबानींच्या लग्नाला का गेला नाही रोहित शर्मा? फोटो व्हायरल झाल्यामुळे झाला खुलासा

Rohit Sharma Not Attend Ambani Wedding : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात देश-विदेशातील बड्या व्यक्तींची गर्दी पाहायला मिळाली.

Kiran Mahanavar

Rohit Sharma Not Attend Ambani Wedding : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात देश-विदेशातील बड्या व्यक्तींची गर्दी पाहायला मिळाली. या लग्नाला क्रिकेटर्सपासून ते सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नात हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादवपासून माजी कर्णधार एमएस धोनीपर्यंत दिसले, पण टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा लग्नात दिसला नाही. त्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले की, रोहित लग्नाला का आला नाही?

अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यात रोहित शर्मा दिसला होता. यादरम्यान नीता अंबानी यांनी रोहितला स्टेजवर बोलावून वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल अभिनंदनही केले होते. त्यानंतर चाहत्यांना आशा होती की, रोहितही लग्नाला नक्कीच हजेरी लावेल. चाहत्यांनी लग्नात इतर क्रिकेटर्सना पाहिले पण रोहित शर्मा दिसला नाही, तेव्हा रोहित लग्नाला का आला नाही, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यानंतर सोशल मीडियावर रोहितचे नवीन फोटो समोर आले, ज्यात रोहित लग्नाला का आला नाही हे उघड झाले.

खरंतर, रोहित शर्मा लंडनमध्ये खेळल्या जात असलेल्या विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये कार्लोस अल्काराज आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यातील पुरुष एकेरीचा उपांत्य सामना पाहण्यासाठी गेला होता. या सामन्यादरम्यानचे रोहितचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यापूर्वी माजी महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही विम्बल्डन चॅम्पियनशिपमधील सामना पाहण्यासाठी आला होता.

रोहित शर्माशिवाय माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकही विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये दिसला होता. दिनेश आपल्या पत्नीसोबत विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये पोहोचला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Block Layoffs : AI ने हिरावला तोंडचा घास ! दिग्गज अमेरिकन कंपनीने ४००० हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Aniket Kothale Death Case : गुन्हा लपवण्यासाठी भयानक षडयंत्र! बडतर्फ पोलिस उपनिरीक्षकाचा क्रूर चेहरा आला समोर; उज्ज्वल निकमांनी पुराव्यांसह कोर्टात केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रज उद्यानात मनसैनिक करणार आंदोलन

Ruoming Pang: 1800 कोटींचं पॅकेजही ठरलं कमी! कोण आहेत Ruoming Pang? Google, Meta, Apple आणि OpenAI मध्ये रस्सीखेच; शेवटी कोण जिंकलं?

Sangli Atpadi news : शिवसेनेचे तृतीयपंथी पंचायत समिती सदस्याचा हृदयविकाराने मृत्यू, सांगलीच्या आटपाडीमधील घटना

SCROLL FOR NEXT