Ranji Trophy sakal
Cricket

Ranji Trophy : तुषार, शार्दुलचा प्रभावी मारा ; तमिळनाडू १४६ धावांत गारद,पहिल्या दिवशी मुंबईचे वर्चस्व

शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे यांच्यासह इतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर बलाढ्य मुंबई क्रिकेट संघाने येथे सुरू झालेल्या रणजी क्रिकेट करंडकातील तमिळनाडूविरुद्धच्या उपांत्य लढतीतील पहिला दिवस गाजवला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे यांच्यासह इतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर बलाढ्य मुंबई क्रिकेट संघाने येथे सुरू झालेल्या रणजी क्रिकेट करंडकातील तमिळनाडूविरुद्धच्या उपांत्य लढतीतील पहिला दिवस गाजवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तमिळनाडूच्या अंगलट आला. तमिळनाडूचा पहिला डाव १४६ धावांवरच आटोपला. मुंबईने पहिल्या दिवसअखेरीस २ बाद ४५ धावा केल्या असून, आता त्यांचा संघ १०१ धावांनी पिछाडीवर आहे.

तमिळनाडूची सुरुवात निराशाजनक झाली. डावातील पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याला पायचीत बाद केले. त्यानंतर मोहित अवस्थीच्या गोलंदाजीवर नारायण जगदीशने शॉर्ट लेगला उभा असलेल्या मुशीर खानकरवी ४ धावांवर झेलबाद झाला. तुषार देशपांडेने प्रदोश पॉलला (८ धावा) स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार साई किशोरचा (एक धाव) त्रिफळा उडवला. तुषार देशपांडेनेच बाबा इंद्रजीत ११ धावांवर झेलबाद झाला.

संक्षिप्त धावफलक : तमिळनाडू - पहिला डाव १४६ धावा (विजय शंकर ४४, वॉशिंग्टन सुंदर ४३, तुषार देशपांडे ३/२४). मुंबई - पहिला डाव २ बाद ४५ धावा (मुशीर खान नाबाद २४, मोहित अवस्थी नाबाद १)

फॉर्ममधील फलंदाज बाद

मुंबईच्या पहिल्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ ५ धावांवर बाद झाला. साई किशोर याने भुपेन लालवानी याला १५ धावांवर तंबूत पाठवले. मुंबईचे दोन फॉर्ममधील फलंदाज बाद झाले. आता मुशीर खान २४ धावांवर, तर मोहित अवस्थी एका धावेवर खेळत आहे.

शंकर - सुंदर जोडीची ४८ धावांची भागीदारी

तमिळनाडूचा संघ संकटात असताना विजय शंकर व वॉशिंग्टन सुंदर या जोडीने ४८ धावांची भागीदारी करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शार्दुल ठाकूर याने शंकरला ४४ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि जोडी तोडली. या खेळीत त्याने आठ चौकार मारले. वॉशिंग्टन सुंदर याने ५ चौकारांसह ४३ धावांची खेळी केली. तो तमिळनाडूच्या डावातील अखेरचा फलंदाज बाद झाला. तुषार देशपांडे याने २४ धावा देत तीन फलंदाज बाद केले. शार्दुल ठाकूरने ४८ धावा देत दोन फलंदाज बाद केले. मुशीर खान व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! तरुणावर ८ जणांचा गोळीबार, जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी; घटनेनं खळबळ

IND vs ENG 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदर OUT, रोहित शर्मावर सस्पेन्स कायम! तिसऱ्या वन डेत कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latest Marathi News Live Update : जंतर मंतरवरील आंदोलनात गोंधळ, अभिजीत दीपकेंवर शाईफेक

भारताच्या अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास! देशातील पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट 'Vikram-1' लाँच

Credit Card Rule: क्रेडिट कार्डवर किती खर्च करावा? पगाराच्या ‘या’ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च पडू शकतो महागात; पाहा नियम

SCROLL FOR NEXT