Shubman Gill sakal
Cricket

Shubman Gill : वर्तमानकाळात जगणे महत्त्वाचे ; शुभमन गिल रांची सामन्याच्या दोन दिवस अगोदर पत्रकारांशी बोलताना

अपयश येत असताना अर्थातच खेळाडूच्या मनात शंका येत असतात. काय होईल... कसे होईल... यश मिळेल ना, का अपयश येईल... हे सगळे विचार मनात येणे स्वाभाविक आहे; पण चांगला खेळाडू तोच असतो जो या विचारांना मागे ठेवून वर्तमानकाळात जगायला शिकतो.

सकाळ वृत्तसेवा

रांची : अपयश येत असताना अर्थातच खेळाडूच्या मनात शंका येत असतात. काय होईल... कसे होईल... यश मिळेल ना, का अपयश येईल... हे सगळे विचार मनात येणे स्वाभाविक आहे; पण चांगला खेळाडू तोच असतो जो या विचारांना मागे ठेवून वर्तमानकाळात जगायला शिकतो. आपल्यासमोर येणाऱ्या फक्त पुढच्या एक चेंडूचा विचार करून खेळतो, शुभमन गिल रांची सामन्याच्या दोन दिवस अगोदर पत्रकारांशी बोलताना सांगत होता.

काही सामन्यात सतत अपयश आल्याने मला स्वत:चाच राग येत होता. लोकांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत यापेक्षा माझ्याच स्वत:कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या म्हणून चिडचिड होत होती. हीच क्रिकेटची गंमत असते की कष्ट करूनही यश मिळतेच असे नाही. तरीही मी सतत सकारात्मक राहण्यासाठी प्रयत्न करत होतो. सरावात सुधारणेच्या प्रक्रियेवर लक्ष देत होतो, असे गिल म्हणाला.

विशाखापट्टणम कसोटीत मला संघाला गरज असताना शतक करता आले याचे समाधान मिळाले. राजकोट कसोटीत दुसर्‍या डावात मला चांगली फलंदाजी जमत होती. दुर्दैवाने मी धावबाद झालो ज्यात कोणाची चूक नव्हती. सगळेच इतके वेगाने घडते की विचार करायला वेळ मिळत नाही, असेही त्याने सांगितले.

विराट कोहली आणि के. एल. राहुल नसताना तरुण खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असल्याचे बोलल्यावर, मला वाटते ज्येष्ठ खेळाडूंच्या गैरहजेरीत तरुण खेळाडूंनी योग्य संधी मिळाल्यावर संधी साधायचा चांगला प्रयत्न केला आहे. यशस्वीने दोन कसोटीत द्विशतके ठोकून वेगळीच उंची गाठली आहे. यशानंतर पाय जमिनीवर ठेवायला संघातील अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मोठे मार्गदर्शन करत आहेत, गिल म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT