India vs Australia Sakal
Cricket

T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलिया की भारत, T20 मध्ये कोणाचं पारडं राहिलंय जड? पाहा आकडेवारी काय सांगते

India vs Australia: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुपर-8 फेरीचा सामना रंगणार आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, India vs Australia: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुपर-8 मधील सामना सोमवारी (24 जून) खेळवला जाणार आहे. हा सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट ल्युसिया येथे पार पडणार आहे. हा सामना दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहचण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

या सामन्याला स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता चालू होणार आहे. हा सामना दोन्ही संघांचा सुपर-8 मधील अखेरचा सामना असणार आहे.

या सामन्यात जर भारताने विजय मिळवला, तर ते उपांत्य फेरीत थेट प्रवेश करतील, मात्र ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला मोठा धक्का बसेल. तसेच जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर भारतासह त्यांचेही उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के होणार आहे. त्यामुळे हा सामना महत्त्वाचा मानला जात आहे.

आमने-सामने आकडेवारी

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 31 सामने खेळवण्यात आले होते. यातील 19 सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तर 11 सामन्यांत पराभव स्विकारला आहे, तसेच 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

त्याचबरोबर टी20 वर्ल्ड कपमध्ये हे दोन संघ आत्तापर्यंत 5 वेळा आमने-सामने आले होते. यातील 3 वेळा भारताने, तर 2 वेळा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवले आहेत. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 2016 नंतर टी20 वर्ल्ड कपमध्ये सामना झालेला नाही.

हवामान अंदाज

सोमवारी सेंट ल्युसियामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सामन्याच्या वेळेतही तिथे ढगाळ वातावरण असणार आहे. जर पावसामुळे सामन्यात अडथळा आला, तर डकवर्थ लुईस नियमाचाही वापर होऊ शकतो. तसेच पावसामुळे सामना शक्य झाला नाही, तर मात्र सामना रद्द होऊ शकतो.

लाईव्ह स्ट्रिमिंग

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे. त्याचबरोबर डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍप किंवा वेबसाईटवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Interfaith Blood Donation: बकरी ईद निमित्त मशिदीत सर्वधर्मीयांचे रक्तदान; ‘मानवता हाच खरा धर्म’चा संदेश

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT