Zimbabwe Sakal
Cricket

IND vs ZIM: भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा, 38 वर्षीय ऑलराऊंडकडे कर्णधारपद

Zimbabwe Squad T20I Series Against India: भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Zimbabwe Squad T20I Series Against India: भारतीय क्रिकेट संघ आता झिम्ब्बावे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वे दौऱ्यात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी यजमान झिम्बाब्वेने १७ जणांच्या संघाची घोषणा केली आहे.

झिम्बाब्वेच्या या संघाचे कर्णधारपद ३८ वर्षीय अनुभवी अष्टपैलू सिकंदर रझा सांभाळणार आहे. पण असे असले तरी संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच जोंगवे ल्यूक, रिचर्ड एनगवरवा, ब्लेसिंग मुझाराबानी असे काही अनुभवी खेळाडूही संघात आहेत.

या संघात अँटम नाकवीलाही संधी देण्यात आली आहे. त्याचे पालक मुळचे पाकिस्तानी असून त्याचा जन्म बेल्जियममध्ये झाला होता. त्यानंतर तो झिब्माब्वे संघात आला आहे.

दरम्यान, अद्यापही त्याची निवड निश्चित होण्यासाठी त्याला अधिकृतरित्या झिम्बाब्वेचे नागरिकत्व मिळण्याची प्रतिक्षा आहे. जर त्याला हे नागरिकत्व लवकर मिळालं, तर तो संघात खेळू शकतो. त्याचबरोबर तेंडाई चतारा, वेसली माधवेरे, ब्रँडन मावुता, डियॉन मायर्स, इनोसंट काइया आणि मिल्टन शुम्बा यांचे पुनरागमन झाले आहे.

अशी आहे टी२० मालिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात होणारी टी२० मालिका ६ जुलैपासून सुरु होणार आहे. ६ जुलैनंतर ७ जुलै, १० जुलै, १३ जुलै आणि १४ जुलै या तारखेला सामने होणार आहेत. हे सर्व सामने हरारेला होणार आहेत. सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४.३० वाजता चालू होतील.

असा आहे झिम्बाब्वे संघ - रझा सिकंदर (कर्णधार), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, काइया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधवेरे वेसली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डियॉन, नाकवी अँटम, एनगवरवा रिचर्ड, शुम्बा मिल्टन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : टीएमसी खासदार नदीमुल हक यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

SCROLL FOR NEXT