Irfan Pathan Reaction to Udaipur Murder Case sakal
क्रीडा

उदयपूर हत्याकांडावर इरफानला बोलणं पडलं महागात; नेटकऱ्यांचा संताप

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एका पोस्टसाठी धर्मांधांनी कन्हैयालालची हत्या केली

Kiran Mahanavar

राजस्थानातील उदयपूरमध्ये घडलेल्या घटनेचे देशभर पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. कन्हैयालालची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून त्यावर प्रतिक्रिया आल्या आहे. या प्रकरणाचा खेळातील अनेक दिग्गजांनी निषेध केला आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने पण या घटनेचा निषेध केला आहे.(Irfan Pathan Reaction to Udaipur Murder Case)

इरफान पठाणने कन्हैया लाल हत्याकांडप्रकरणी ट्विट करत याला लज्जास्पद घटना म्हटले आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एका पोस्टसाठी धर्मांधांनी कन्हैयालालची हत्या केली. या घटनेनंतर उदयपूर पोलिसांनीही नाकाबंदी केली आहे. इरफान पठाणने ट्विटमध्ये लिहिले की, तुम्ही कोणत्या धर्मावर विश्वास ठेवता. एखाद्या निष्पाप जीवाला त्रास देणे म्हणजे संपूर्ण मानवतेला त्रास देण्यासारखे आहे. इरफानने या ट्विटमध्ये कोणत्याही धर्माचे नाव घेतलेले नाही आणि त्यामुळे चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तर इंटरनेट बंद करण्यात आले आहे. तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कन्हैयालालच्या आठ वर्षांच्या मुलाने मोबाईलवरून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर काही लोक संतप्त झाले आणि तीन आरोपींनी त्याच्याच दुकानात घुसून तरुणाची निर्घृण हत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT