Cristiano Ronaldo esakal
क्रीडा

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या टी - शर्टचा भूकंपग्रस्तांसाठी होणार लिलाव

अनिरुद्ध संकपाळ

Cristiano Ronaldo : तुर्की आणि सिरियातील भूकंपानंतर मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. या दोन देशांसाठी जगभरातून मदतीचा ओघ वाहू लागला आहे. आता स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने देखील मदतीचा हात दिला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जुवेंटसचा संघ सहकारी मेरिह डेमिरल हा रोनाल्डोचा हस्ताक्षर केलेला टी - शर्टचा लिलाव करणार आहे.

मेरिह डेमिरल तुर्की आणि सिरियाच्या भूकंपानंतर ट्विट केले. तो म्हणाला की, 'मी आताच ख्रिस्तियानो रोनाल्डोशी बोललो. तुर्कीमध्ये जे काही झालं हे पाहून तो खूप दुःखी झाला आहे. आम्ही आमच्या कलेक्शनमधील ख्रिस्तियानो रोनाल्डोचा स्वाक्षरी केलेला टी - शर्ट लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. लिलावातून जी रक्कम येईल ती सर्व भूकंपग्रस्तांना देण्यात येणार आहे.'

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत एकूण 8000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक इमारती पत्त्याच्या घरासारख्या कोसळल्या आहेत.

तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, 6 फेब्रुवारी रोजी कहरामनमाराश परिसरात झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपानंतर आतापर्यंत एकूण 435 भूकंपांची नोंद झाली आहे.भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्यासाठी आतापर्यंत एकूण 60,217 कर्मचारी आणि 4,746 वाहने आणि बांधकाम उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार असोसिएटेड प्रेसने तुर्की आणि सीरियामध्ये शक्तिशाली भूकंपांमुळे आतापर्यंत 7,700 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. या व्यापक विध्वंसा दरम्यान मृतांची संख्या वाढतच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT