Dale-Steyn-Retired 
क्रीडा

आफ्रिकेची 'स्टेन'गन कायमची थंडावली... निवृत्तीची केली घोषणा!

विराज भागवत

महान फलंदाजांची दांडी गुल करणाऱ्या डेल स्टेनचा क्रिकेटला अलविदा

Dale Steyn Retirement: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने आज सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमधून निवृत्तीची घोषणा केली. आफ्रिकेसाठी १७ वर्षे धडाडणारी स्टेन गन अखेर आज क्रिकेटच्या मैदानातून कायमची थंडावली. आपल्या कारकिर्दीत डेल स्टेनने अनेक महान फलंदाजांचा सामना केला. त्याशिवाय, अनेक फलंदाजांचे त्रिफळी उडवून त्यांच्या मनात आपल्या वेगाची दहशत निर्माण केली. ३८ वर्षीय डेल स्टेनने १७ वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतर आज ट्वीटरवरून निवृत्तीची घोषणा केली. ९३ कसोटी, १२५ वन डे आणि ४७ टी२० सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याने क्रिकेट कारकिर्दीला रामराम ठोकला. कसोटी क्रिकेटमधून तो २०१९ मध्येच निवृत्त झाला होता.

"आज मी अधिकृतरित्या माझ्या सर्वात आवडत्या गोष्टीला अलविदा म्हणतोय. क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय वेदनादायी आहे पण मला क्रिकेटने जे काही दिलं त्यासाठी मी क्रिकेटचा आभारी आहे. माझ्या कुटुंबीयांपासून ते संघातील सर्व सहकाऱ्यांपर्यंत आणि पत्रकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांचाच मी आभारी आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे वर्ष कोरोनाच्या दृष्टीने सुसह्य आहे. साऱ्यांनी काळजी घ्या", अशा शब्दात त्याने आपल्या निवृत्तीच्या वेळच्या भावना व्यक्त केल्या. गेली २० वर्षे सराव, क्रिकेट सामने, प्रवास, हार, जीत, सोललेले पाय, जेट लॅग, आनंद, बंधूभाव आणि त्यासारख्या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. आठवणी खूप साऱ्या आहेत. आभार मानण्यासाठीही खूप लोक आहेत. या साऱ्यांचेच आभार, असंही स्टेनने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT