David Willey  esakal
क्रीडा

David Willey : वर्ल्डकपनंतर थांबणार... इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजानं घेतला निवृत्तीचा निर्णय

अनिरुद्ध संकपाळ

David Willey : इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 33 वर्षाच्या हा गोलंदाज वर्ल्डकपनंतर आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवणार आहे. विलीने निवृत्तीचा निर्णय इन्स्टाग्रामवर भली मोठी पोस्ट लिहून जाहीर केला. डेव्हिड विलीने 2015 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

विली आपल्या सोशल मीडिया पोस्टवर म्हणतो, 'मला हा दिवस कधीच येऊ नये असे वाटत होतं. लहान असल्यापासून माझं इंग्लंडकडून क्रिकेट खेळणं हे एकच स्वप्न होतं. आता मी खूप विचाराअंती आणि चर्चा करून मी निर्णय घेतला आहे. आता वेळ आली आहे. वर्ल्डकपनंतर मी क्रिकेटच्या सर्व आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे.'

'मी खूप अभिमानाने इंग्लंडचा शर्ट घातला अन् माझं सर्वस्व इंग्लंडला दिलं. मला या मर्यादित षटकांच्या सुंदर संघाचा भाग होता आलं हे माझं नशीब समजतो. मी या प्रवासात काही चांगल्या आठवणी आणि ग्रेट मित्र कमवले आहेत.'

डेव्हिड विलीने आपल्या पोस्टमध्ये कुटुंबाचे देखील आभार मानले. तो म्हणाला, 'मला असं वाटतं की मी अजूनही ऑन फिल्ड आणि ऑफ द फिल्ड बरंच योगदान देऊ शकतो. मी अजूनही चांगलं क्रिकेट खेळू शकतो. माझा निर्णय आणि आमच्या वर्ल्डकपमधील कामगिरीचा काही संबंध नाही.'

'मला खात्री आहे की जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मीउर्वरित वर्ल्डकप सामन्यात त्यात जोशाने खेळणार आहे. मी माझं सर्वस्व देणार आहे.'

विलीने इंग्लंडकडून 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यात त्याने 70 वनडे आणि 43 टी 20 सामने खेळले आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT