emiliano martinez fifa-world cup 2022-winner-goalkeeper-from-argentina-arrives-in-kolkata-india-mohun-bagan football news marathi  
क्रीडा

Football: मेस्सीच्या टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा गोलकीपर म्हणाला, 'भारतात येण्याचं माझं स्वप्न...'

Kiran Mahanavar

Emiliano Martinez : अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता आणि गोल्डन ग्लोव्हचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ भारत दौऱ्यावर आहे. सोमवारी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती.

मार्टिनेझच्या चमकदार कामगिरीमुळे अर्जेंटिनाने कतारमधील 2022 फिफा विश्वचषक जिंकला. अनेक उत्कृष्ट पेनल्टी सेव्ह आणि गोलकीपिंगसाठी त्याला गोल्डन ग्लोव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतात येणे हे एक स्वप्न होते - मार्टिनेझ

एमिलियानो मार्टिनेझ यांनीही विमानतळावर भव्य स्वागत स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान तो म्हणाला की, मी भारतात येण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि इथे आल्यानंतर मला खूप छान वाटत आहे. भारतात येण्याचे माझे स्वप्न होते. मला येथे आल्याचा आनंद आहे. विमानतळावर मार्टिनेझला पाहण्यासाठी फुटबॉल चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

मार्टिनेझ भारतात येण्याचे कारण?

कोलकाता विमानतळावर जोरदार स्वागत केल्यानंतर मार्टिनेझ हॉटेलकडे रवाना झाला. त्याच्या भारतात येण्याचे कारण एक कार्यक्रम आहे. मार्टिनेझ मंगळवारी मोहन बागान क्लबच्या 'पेले-मॅराडोना-सोबर्स गेट'चे उद्घाटन करणार आहे.

"मार्टिनेझचाही सत्कार केला जाईल आणि ते आमच्या क्लबची पायाभूत सुविधा देखील पाहतील आणि काही निवडक सदस्यांना भेटतील," मोहन बागान यांनी त्यांच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर सांगितले.

ममता बॅनर्जी आणि गांगुली यांची घेणार भेट

मार्टिनेझ भारतात ३ दिवस राहणार आहेत. यादरम्यान तो संतोष मित्र चौकातील शाळकरी मुलांनाही भेटणार आहेत. तो मोहन बागान क्लब येथे पेले, दिएगो गेटचे उद्घाटन करणार आहे. तसेच, प्रीमियर लीग क्लब अॅस्टन व्हिलाकडून खेळणारा मार्टिनेझ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची भेट घेणार आहे. मार्टिनेझ एका चॅरिटी सामन्यात प्रमुख पाहुणे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT