Virat Kohli England vs India 2nd ODI sakal
क्रीडा

लॉर्ड्सच्या मैदानावर Virat Kohli चा स्वॅग निराळा, VIDEO पाहून चाहते थक्क

विराट कोहली लॉर्ड्सवर फलंदाजीला येतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Kiran Mahanavar

Virat Kohli England vs India 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. भारतीय संघाने इंग्लंडला 49 षटकात 246 धावांत गुंडाळले. या सामन्यात भारतासाठी युझवेंद्र चहल सर्वात यशस्वी गोलंदाज करत 10 षटकात 47 धावा देत 4 बळी घेतले. विराट कोहली लॉर्ड्सवर फलंदाजीला येतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 10 चेंडू खेळून एकही धाव न घेता बाद झाला. शिखर धवन 26 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. ऋषभ पंत खाते न उघडताच बाद झाला. विराट कोहली क्रिकेटच्या चांगल्या टप्प्यातून जात नसला तरी त्याचा आत्मविश्वास अजूनही कमी झालेला नाही. लॉर्ड्सच्या गॅलरीतील वॉकचा व्हिडिओ प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचा आहे. चांगली सुरुवात केल्यानंतर विराट कोहली 16 धावांवर बाद झाला.

दुसरीकडे, इंग्लंडला प्रथम खेळताना 49 षटकांत केवळ 246 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून मोईन अलीने 47 आणि डेव्हिड विलीने 41 धावा केल्या. याशिवाय बेअरस्टोने 38 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. चहल सर्वात यशस्वी ठरला आणि 10 षटकात 47 धावा देत 4 बळी घेण्यात यशस्वी ठरला. चहल व्यतिरिक्त बुमराह आणि पांड्याला 2-2 विकेट्स मिळाल्या, तर शमी आणि कृष्णा यांनी १-१ विकेट घेतली. भारतीय फिरकीपटू चहलने लॉर्ड्सवर इतिहास रचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT