World Cup 2023 Pakistan 
क्रीडा

World Cup 2023 Pakistan : एकही चेंडू न खेळता पाकिस्तानची वर्ल्ड कपमधून गच्छंती? जाणून घ्या गणित

Kiran Mahanavar

World Cup 2023 Pakistan : आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 चा 44 वा सामना आज 11 नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल. उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची पाकिस्तानची ही शेवटची आशा आहे. मात्र, पाकिस्तान संघ टॉप 4 मध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा नेट रनरेट.

पण त्यांना नेट रनरेट सुधारण्यासाठी गतविजेत्या इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. मात्र, असे होणे अशक्य आहे. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान आपले सर्वस्व देईल.

आता असे एक समीकरण समोर आले आहे ज्यामध्ये पाकिस्तान एकही चेंडू न खेळता वर्ल्ड कप मधून बाहेर जाऊ शकतो.

न्यूझीलंड संघ सध्या 0.743 च्या नेट रनरेटने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान 0.036 आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध केवळ 2 गुणांची गरज नाही तर नेट रनरेटचीही गरज आहे.

न्यूझीलंडपेक्षा चांगला नेट रनरेट करण्यासाठी पाकिस्तानला सुमारे 287 धावांनी विजय मिळवावा लागेल. आणि लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना 284 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकावा लागेल. जर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना मोठी धावसंख्या उभारण्याची आणि इंग्लंडला लवकर बाद करण्याची संधी आहे. याची शक्यताही फार कमी आहे. पण पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केली तर पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच ते वर्ल्ड कपमधून बाहेर जातील.

याचे कारण पाकिस्तानला 2.4 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. जे अशक्य आहे. पाकिस्तानने सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकली तर त्याला डोळे मिटून प्रथम फलंदाजी करायची आहे. पण इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यास पाकिस्तानचा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त होईल. सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच पाकिस्तान सामन्यातून जवळपास बाहेर पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT