FIFA World Cup 2022 Sakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : ब्राझीलच्या रिचार्लीसनने मारली पहिली बायसिकल किक; Video Viral

सकाळ डिजिटल टीम

फिफा वर्ल्डकप 2022 मधील संभाव्य विजेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीललने आपली वर्ल्डकप मोहिम विजयाने सुरू केली. ग्रुप G च्या सामन्यात सर्बियाचा 2 - 0 असा पराभव केला. या सामन्यात ब्राझीलच्या रिचार्लीसनने पहिली बायसिकल किक मारली आहे. या गोलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर फिफा वर्ल्ड कपच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

दरम्यान, ब्राझीलच्या रिचार्लीसनने मारलेल्या कीकचा २० सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कीक मारल्यानंतर ब्राझीलच्या संघाने केलेला जल्लोष या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर रिचार्लीसनची ही पहिलीच बायसिकल किक होती.

सन २००२नंतर ब्राझीलला विश्‍वकरंडक जिंकता आलेला नाही. त्यामुळे सहाव्यांदा विश्‍वविजेता होण्याचा दबाव त्यांच्यावर असणार, हे निश्‍चित आहे. यंदाच्या स्पर्धेमध्ये ब्राझीलच्या संघात १६ युवा खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू पहिल्यांदाच विश्‍वकरंडकात सहभागी झाले आहेत.

विनिशियस ज्युनियर, रॉड्रिगो, राफिना, एडर मिलिटाओ, ब्रुनो गिमरेस, अँथोनी या खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची संधी यावेळी मिळणार आहे. विनिशियस याला ब्राझीलच्या अंतिम संघात स्थान देण्यात येईल की नाही, याबाबत मुख्य प्रशिक्षक टिटे यांनी मौन बाळगले आहे. अंतिम संघात स्थान दिल्यास तो नेमार, रिचर्लीसन व राफिना यांच्यासोबत आक्रमक फळीत खेळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला, राजू शेट्टी, बंटी पाटलांची भूमिका काय?

Satish Patil Death : ओव्हरटेक करताना काळाचा घाला! सांगली बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहायक सतीश पाटील अपघातात ठार; दुचाकीची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोराची धडक

Nepal Flood: नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील ११० हून अधिक पर्यटक अडकले; मुंबईतील डॉक्टर दाम्पत्याशीही संपर्क तुटला..

Nigdi BSNL Duct: चुलत भावासमोरच दोघांचा गुदमरून मृत्यू; निगडी प्राधिकरणातील घटना, गर्भवती पत्नी अन् चिमुकल्या लेकरांना सोडून मनोजचा अंत..

Sugar Rates: ६४०० रुपयांवर गेलेली साखर अचानक ४८०० वर! नेमकं आठवडाभरात काय घडलं?

SCROLL FOR NEXT