Hockey Player Sandeep Singh esakal
क्रीडा

Indian Hockey Team : मोठी बातमी! महिला प्रशिक्षकाचा विनयभंग; क्रीडा मंत्र्यांविरुध्द गुन्हा दाखल

चंदीगडच्या एसपींची भेट घेतल्यानंतर महिला प्रशिक्षकानं क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार केली होती.

सकाळ डिजिटल टीम

चंदीगडच्या एसपींची भेट घेतल्यानंतर महिला प्रशिक्षकानं क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार केली होती.

चंदीगड : चंदीगड पोलिसांनी (Chandigarh Police) भारतीय हॉकी संघाचा (India Hockey Team) माजी स्टार खेळाडू आणि हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग (Hockey Player Sandeep Singh) यांच्याविरोधात महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

चंदीगडच्या एसपींची (SP Chandigarh) भेट घेतल्यानंतर महिला प्रशिक्षकानं क्रीडामंत्र्यांविरोधात तक्रार केली होती. आता मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंदीगड येथील सेक्टर 26 पोलिस स्टेशनमध्ये कलम-354, 354A, 354B, 342, 506 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर 2022 रोजी लेडी कोचनं चंदीगड पोलीस मुख्यालयात जाऊन एसएसपींची भेट घेतली आणि तिची तक्रार नोंदवली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण तपासासाठी 26 पोलिस स्टेशनला पाठवलं होतं. आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, क्रीडा राज्यमंत्री संदीप सिंह यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन महिला प्रशिक्षकाच्या आरोपांचं खंडन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

कुकू कोहलींशी लग्न केल्यावरही अरुणा इराणी राहिल्या निपुत्रिक; का होऊ दिलं नाही स्वतःचं मूल? हे होतं कारण

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

SCROLL FOR NEXT