Gautam Gambhir Asian Games 2023 esakal
क्रीडा

Gautam Gambhir : गंभीरचे पुन्हा चुकेचे ट्वीट; खेळाडू अजून चीनमध्ये पोहचली नाही अन् केलं सुवर्ण पदकाबद्दल अभिनंदन

अनिरुद्ध संकपाळ

Gautam Gambhir Asian Games 2023 : भाजपचा खासदार आणि भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने पुन्हा एकदा ट्विटवर चुकीची पोस्ट केली आहे. त्याने 25 सप्टेंबरला देखील कपिल देव यांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर संभ्रम निर्माण झाला होता. आज त्याने अजून एक चुकीचे ट्विट केल. यानंतर गौतम गंभीर चांगलाच ट्रोल होऊ लागला आहे.

गौतम गंभीरने भारतीय अॅथलिट ज्योती याराजीने सुवर्ण पदक जिंकल्याची पोस्ट करत तिचे अभिनंदन केले होते. मात्र या पोस्टमध्ये याराजीचा जो फोटो वापरण्यात आला आहे तो एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील आहे. या स्पर्धेत ज्योतीने रौप्य आणि सुवर्ण पदक जिंकले होते.

मात्र गंभीरने हा फोटो एशियन गेम्सच्या संदर्भात वापरला. गंभीर सारख्या मोठ्या व्यक्तीने ज्या ज्योतीचे एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल अभिनंदन केले ती अजून आपल्या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी चीनमध्ये पोहचली देखील नाहीये.

गंभीर आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, 'हे सुवर्ण पदक या गोष्टीचा खरी साक्ष देतो की तुमची परिस्थिती कशीही असो स्वप्न साकार होतात. जबरदस्त ज्योती याराजी.' गंभीरचे हे ट्विट एशियन गेम्सच्या पार्श्वभूमीवर केल्याचे मानले जात आहे. त्याने एशियन गेम्सचा पोस्टमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. मात्र हे ट्विट दिशाभूल करणारे आहे.

आशा भोसलेंनीही केली तीच चूक

गंभीरच्या आधी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी देखील ज्योती याराजीचे सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, एशियन गेम्समध्ये 100 मीटर अडखळ्यांच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आंध्र प्रदेशच्या याराजीचे हार्दिक अभिनंदन.' या पोस्ट सोबत आशा भोसले यांनी याराजीचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. मात्र व्हिडिओ एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील आहे.

ही स्पर्धा या वर्षी जुलै महिन्यात झाली होती. या स्पर्धेत ज्योतीने सुवर्ण पदक जिंकले होते. ज्योत चीनमध्ये होत असलेल्या एशियन गेम्समध्ये अजून मैदानावर उतरलेली नाही. ती महिला 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा 1 ऑक्टोबरला होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

RCB vs DC Live: विराट कोहली अपयशी ठरला, वैभव सूर्यवंशीचा 'पॉवर'फुल विक्रम थोडक्यात वाचला! १५ वर्षीय फलंदाज वरचढ ठरला

Inflation Rise: IMD चा कमी पावसाचा इशारा! शेती संकटात? महागाई वाढणार का?

Latest Marathi News Live Update: ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम येथे शिवसेना जाहीर निषेध आंदोलन

बिग बॉस मराठीच्या घरात गायक अभिजीत सावंतची ENTRY ! घरातील स्पर्धकांना केलं गाण्याने मंत्रमुग्ध ..

SCROLL FOR NEXT