Goalkeeper Leandro Requena scores from goal kick in Chilean football league world record 101-meter goal in marathi news kgm00  
क्रीडा

Football Video : आरा रा रा रा खतरनाक...! गोलकीपरने 101 मीटरवरून केला गोल, संपूर्ण टीमही हँग

गोलकीपर जोमात विरोधी टीम कोमात!

सकाळ ऑनलाईन टीम

Football Video : चिली फुटबॉल लीगमध्ये एका गोलरक्षकाने आपल्या जागेवर उभे राहून नेत्रदीपक शॉट मारून गोल केला. या गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गोलरक्षकाचा हा गोल पाहून सर्व चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर गोलकीपरचे खूप कौतुक होत आहे.

या सामन्यात अर्जेंटिनाचा गोलकीपर लिएंड्रो रिकेना केब्रेसल संघाकडून खेळत होता. बॉल त्याच्या बॉक्सपर्यंत पोहोचला आणि सर्व खेळाडू त्याच्या दिशेने धावत आले. अशा स्थितीत रिकेनाने पूर्ण ताकदीनिशी किक मारली आणि चेंडू थेट विरोधी संघाच्या यष्टीरक्षकासमोर पडला आणि त्याच्या डोक्यावरून बाऊन्स होऊन गोलपोस्टच्या आत गेला.

विरोधी संघाच्या गोलरक्षकाने चेंडू रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. आता या गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहते आणि क्रीडा पंडित दावा करतात की हा आतापर्यंतचा सर्वात लांब गोल आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिकीनाने 101 मीटर अंतरावरून हा गोल केला आहे. या सामन्यात केब्रेसल संघाने कोलो-कोलो संघाचा 3-1 असा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT