Hardik Pandya Out Of India Match Against New Zealand 
क्रीडा

Hardik Pandya : BCCI चे ट्वीट अन् कर्णधार रोहित टेन्शनमध्ये! न्यूझीलंडविरुद्ध काय असणार संघाचे टीम कॉम्बिनेशन?

Kiran Mahanavar

Hardik Pandya Out Of India Match Against New Zealand : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या पुढील सामन्यातून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत अपडेट जारी केले आहे.

हार्दिकच्या तब्येतीचे अपडेट देताना बीसीसीआयने सांगितले की, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध भारताच्या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याला दुखापत झाली.

बीसीसीआयने पुढे सांगितले की, अष्टपैलू खेळाडूला स्कॅनसाठी नेण्यात आले असून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या सतत देखरेखीखाली असेल. 20 ऑक्टोबर रोजी तो संघासोबत धरमशालाला जाणार नाही. आता तो थेट लखनऊ येथे संघात सामील होईल जिथे भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध आहे.

बीसीसीआयच्या या ट्वीटनंतर कर्णधार रोहित शर्माला नक्कीच टेन्शन आला असणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी संघ व्यवस्थापनाला त्याचा बदली खेळाडू आणि टीम कॉम्बिनेशन याबाबत खूप विचार करावा लागणार आहे.

हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नाही, याची पुष्टी बीसीसीआयने केली आहे. त्यामुळे टीम कॉम्बिनेशन बद्दल बोलायचं झालं तर, शार्दुलला विश्रांती दिली जाऊ शकते आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला खेळवले जाऊ शकते, कारण धर्मशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे.

त्याचवेळी हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. या कॉम्बिनेशन नुसार भारताकडे रोहित, शुभमन, विराट, श्रेयस, राहुल आणि सूर्याच्या रूपाने सहा फलंदाज असतील. त्याचबरोबर जडेजाच्या रूपाने एक अष्टपैलू खेळाडू असेल. शमी, बुमराह आणि सिराजच्या रूपाने तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज आणि कुलदीपच्या रूपात एक स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजही असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT