Hardik Pandya Injury Update sakal
क्रीडा

Hardik Pandya : भारतीय संघाला मोठा धक्का! उपकर्णधार न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उपचारासाठी गेला बंगळुरूला?

Kiran Mahanavar

Hardik Pandya Injury Update : वर्ल्ड कप 2023 च्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. यानंतर तो लंगडत मैदानाबाहेर गेला आणि नंतर त्याच्या पायाचे स्कॅनिंग करण्यात आले.

दरम्यान, पांड्या 22 ऑक्टोबरला धर्मशाला येथे होणार्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडल्याची बातमी येत आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू उपचारासाठी बेंगळुरू येथील एनसीएमध्ये जाणार आहे. तेथे त्याला इंजेक्शन देखील दिले जाऊ शकतात.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेट्सने मोठा विजय नोंदवला. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले आहेत.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्या लखनऊमध्ये संघात सामील होऊ शकतो आणि तो 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हार्दिक पांड्या बेंगळुरूला जाणार आहे, जिथे त्याला एनसीएला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. वैद्यकीय पथकाने त्याच्या घोट्याच्या स्कॅन केले आहे. रिपोर्टमध्ये असे दिसत आहे की इंजेक्शन दिल्यानंतर तो बरा होईल. बीसीसीआयने इंग्लंडमधील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यांचेही तेच मत होते. तो पुढचा सामना खेळू शकणार नाही.

गोलंदाजी करताना लिटन दासने मारल्याला चेंडू थांबवताना हार्दिक पांड्या जखमी झाला. या सामन्यात त्याला केवळ 3 चेंडू टाकता आले. यानंतर तो संपूर्ण सामन्यात परतला नाही. मात्र, दुखापतग्रस्त हार्दिकच्या जागी वर्ल्ड कप संघात अन्य कोणत्याही खेळाडूला स्थान देण्याबाबत कोणतीही चर्चा नाही.

याआधी वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. अष्टपैलू आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आशिया कपदरम्यान जखमी झाला होता. यानंतर अक्षरच्या जागी आर अश्विनचा संघात समावेश करण्यात आला.

अश्विनला आतापर्यंत केवळ एका सामन्यात संधी मिळाली आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विकेट मिळाली. जर हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्ध खेळला नाही तर अश्विन किंवा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यापैकी एकाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT