ICC T20 Ranking  esakal
क्रीडा

ICC T20 Ranking : मोहम्मद रिझवानला दिला धक्का; यावेळी भारतीय नाहीतर इंग्लंडच्या खेळाडूची सरशी

अनिरुद्ध संकपाळ

ICC T20 Batting Ranking Phil Salt : आयसीसीने टी 20 बॅटिंग रँकिंगची नुकतीच घोषणा केली. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज फिल सॉल्टने ताज्या रँकिंगमध्ये मोठी उसळी घेतली असून तो थेट दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने कारकिर्दीतील सर्वात चांगले 802 रेटिंग गुण मिळवले आहेत.

सॉल्टने वेस्ट इंडीज विरूद्ध इंग्लंड टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचा फायदा त्याला आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये झाला आहे. इंग्लंडच्या सलामीवीराने त्रिनिदाद येथे झालेल्या दोन सामन्यात 119 आणि 38 धावा केल्या. त्यामुळे त्याने 18 स्थानांची उसळी घेतली. रँकिंगमध्ये पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान हा 787 रेटिंगसह तिसघ्या स्थानावर आहे.

जरी सॉल्टने 18 स्थानांची उसळी घेतली असली तरी त्याला सूर्यकुमार यादवच्या अव्वल स्थानाला धक्का पोहचवता आलेला नाही. सूर्यकुमार यादव आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. त्याचे 887 रेटिंग पॉईंट्स झाले आहेत.

इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज लिम लिव्हिंगस्टोन याने देखील आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये मोठी उसळी घेतली. तो तब्बल 27 स्थानांची उडी घेत 38 व्या स्थानावर पोहचला आहे. त्याने वेस्ट इंडीजविरूद्धच्या दोन सामन्यात नाबाद 54 आणि 28 धावांची खेळी केली. अष्टपैलू असलेल्या लिव्हिंगस्टोनने अष्टपैलू श्रेणीत देखील आपलं रँकिंग सुधारलं आहे. त्याने चार स्थानांनची सुधारणा करत 175 रेटिंग पाईंट्सह आठव्या स्थानावर पोहचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT