ICC T20 Ranking  esakal
क्रीडा

ICC T20 Ranking : रॉकेट सिंग शुभमन गिल! थेट 168 स्थानांची उसळी; टी 20 चं 'तख्त' कर्णधार पांड्याच्या टप्प्यात

अनिरुद्ध संकपाळ

ICC T20 Ranking : आयसीसीने नुकतेच टी 20 प्लेअर रँकिंग प्रसिद्ध केली आहे. या रँकिंगमध्ये न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारणाऱ्या भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. टी 20 अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंगने 8 स्थानांची उसळी घेतली आहे. या सर्वात लक्ष वेधून घेतले ते शुभमन गिलच्या रँकिंगने. टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये पहिल्या 100 जणांमध्ये देखील नसलेल्या शुभमन गिनले मोठी उसळी घेत थेट 30 वा क्रमांक पटकावला आहे.

भारताचा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर होता. भारताने न्यूझीलंडचा 2 - 1 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात हार्दिकने 4 षटकात 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने फलंदाजीत 17 चेंडूत 30 धावा केल्या होत्या.

दुसरीकडे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या रँकिंगमध्ये मोठी उसळी घेतली आहे. तो न्यूझीलंड मालिकेपूर्वी 21 व्या स्थानावर होता. आता त्याने 8 स्थांनी उसळी घेत 13 वे स्थान पटकावले आहे. अर्शदीप सिंगकडे 635 रेटिंग पॉईंट्स आहेत.

याचबरोबर न्यूझीलंडविरूद्ध भारताचा सलामीवीर शुभमन गिलने 63 चेंडूत 126 धावांची तुफानी शतकी खेळी केली होती. गिलने यापूर्वी टी 20 क्रिकेटमध्ये अर्धशतकही ठोकले नव्हते. त्याने थेट भारताकडून टी 20 क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी करत धमाका केला. हा धमाका त्याच्या रँकिंगमध्येही दिसून आला.

23 वर्षाचा गिल टॉप 100 च्या यादीत देखील नव्हता. मात्र या शतकी खेळीमुळे त्याने थेट 168 स्थानांनी उसळी घेतली. तो आता 30 व्या स्थानावर पोहचला आहे. त्याने ही कामगिरी अवघ्या 6 टी 20 सामन्यात केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT