Babar-Azam-Virat-Kohli-KL-Rahul 
क्रीडा

ICC T20 Rankings: विराट, राहुलची घसरण; बाबर आझमची जागा भक्कम

टीम इंडियाला डोकेदुखी ठरणाऱ्या रिझवानलाही क्रमवारीत बढती

विराज भागवत

टीम इंडियाला डोकेदुखी ठरणाऱ्या रिझवानलाही क्रमवारीत बढती

ICC T20 Rankings: भारताचा कर्णधार विराट कोहली याने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात झुंजार अर्धशतकी खेळी केली. तरीही ICC ने जारी केलेल्या टी२० क्रमवारीत त्याची एका स्थानाने घसरण झाली असून तो पाचव्या स्थानी विराजमान झाला आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुल याने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी न केल्यामुळे त्यालाही फटका बसला आहे. टी२० क्रमवारीत त्याची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो आठव्या स्थानी पोहोचला आहे. विराट कोहलीने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी केल्याने त्याचे सध्या ७२५ रेटिंग पाँइंट्स आहेत. तर लोकेश राहुलचे सध्या ६८४ रेटिंग पाँइंट्स आहेत.

भारतीय गोलंदाजांची पिसं काढणारा पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याला क्रमवारीत बढती मिळाली आहे. तीन स्थानांची बढती घेत तो चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्क्रम याने ऑस्ट्रेलिया आणि विंडिजविरूद्ध अनुक्रमे ४० आणि ५१ धावांची खेळी केल्याने त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान मिळवले आहे. त्याने आठ स्थानांची बढती घेत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहेत. टी२० क्रमावारीत अव्वलस्थानी इंग्लंडचा डेव्हिड मलान ८३१ रेटिंग पाँइंट्ससह विराजमान आहे. तर पाक कर्णधार बाबर आझम दुसऱ्या स्थानी असून त्याचे ८२० रेटिंग पॉइंट्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT