illegal application case state kabaddi association elections hearing in bombay high court Sakal
क्रीडा

Kabaddi Association Election : कबड्डी’चा वाद न्यायालयात अवैध अर्ज प्रकरणावरील गुरुवारच्या सुनावणीकडे लक्ष

बदल अर्जाचा कांगावा करून आम्ही मोठा गुन्हा केला आहे, असे भासविण्यात येत आहे. आम्ही धर्मादाय आयुक्त कार्यालयात सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत केलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी बदल अहवाल वेळेत न दिल्याचे कारण देत मतदारांच्या अंतिम यादीतून नगर जिल्हा संघटनेची दोन नावे अवैध ठरविली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात खासदार नीलेश लंके व सच्चिदानंद भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या याचिकेवर गुरुवारी (ता. १८) सुनावणी होणार आहे. तसेच, सातारा जिल्हा संघटनेनेही या आधीच याचिका दाखल केली असून, त्यांच्या याचिकेवर गुरुवारीच सुनावणी होणार आहे. राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्हा संघटनेने मतदार म्हणून पाठविलेली खासदार नीलेश लंके व सच्चिदानंद भोसले यांची नावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पहिल्या यादीत अवैध ठरविली.

या निर्णयाविरोधात म्हणणे मांडण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. संघटनेतर्फे देण्यात आलेल्या मुदतीत सर्व अटींची पूर्तता करण्यात आली होती. त्यानंतरही खासदार लंके, भोसले यांच्यासह इतर जिल्ह्यातील नावे अवैध ठरविण्यात आली.अवैध ठरविण्यात आलेल्यांमध्ये अरविंद सावंत (रत्नागिरी), समीर थोरात (सातारा), मनोज ठाकूर, वक्केश राऊत व माणिक वोतोंडे (पालघर) यांचा समावेश आहे.

आता न्यायालयच निर्णय घेईल

बदल अर्जाचा कांगावा करून आम्ही मोठा गुन्हा केला आहे, असे भासविण्यात येत आहे. आम्ही धर्मादाय आयुक्त कार्यालयात सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत केलेली आहे. निवडणूक अधिकाऱ्याला २ व ३ जुलै रोजी हरकती, तक्रारींअगोदरच पूर्तता केली होती. तरीही ३० जून रोजी कागदपत्रे सादर केली नाही, म्हणून अर्ज बाद ठरविण्यात आले. हा जुलमी अन्याय आहे, यामागे गहन राजकारण असून, आता न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असेही खासदार नीलेश लंके म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Terror plot: गरीबनगर कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत हल्ल्याचा कट; आयएसआय-दाऊद कनेक्शनसह नऊ आरोपी अटकेत

Vaibhav Sooryavanshi: तू किती दूध पितोस?" रवी शास्त्रींच्या प्रश्नावर Vaibhav Sooryavanshi चं उत्तर ऐकून सगळेच हसू लागले! VIDEO व्हायरल

'मी तृप्तीला दहाव्या मिनिटाला म्हणालो, चल' सिद्धार्थ जाधव रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमधून लगेच निघून गेलेला, म्हणाला...

कोकण रेल्वेचे आस्ते कदम! तेजस एक्स्प्रेस १२ तास लेट; मांडवी, कोकणकन्याही ४ तास उशिरा, चाकरमानी हैराण

RCB vs GT Final: विराट कोहली-साई सुदर्शन भिडले, भर मैदानातच एकमेकांशी वाद घालतानाचा Video Viral

SCROLL FOR NEXT