india vs australia test  ेोकोत
क्रीडा

IND vs AUS: सहकारी खेळाडूने वाढले टेंशन! जडेजा पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर?

रोहितची पहिली पसंती कोण?

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचाही समावेश करण्यात आला आहे. तो दीर्घकाळ दुखापतीने त्रस्त होता आणि टीम इंडियातून ही बाहेर होता. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रवींद्र जडेजाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या मालिकेत रवींद्र जडेजाचे टेंशन या सहकारी खेळाडूने वाढले आहे.

दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यापैकी केवळ एका खेळाडूचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला जाईल, असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.

एका टीव्ही चॅनलशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, अक्षर पटेलही रवींद्र जडेजासारखा खेळाडू आहे. दोघेही डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत आणि खालच्या क्रमाने फलंदाजी करून उपयुक्त डाव खेळतात. समान कौशल्य असल्यामुळे दोघांपैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच स्थान मिळेल.

रवींद्र जडेजा गेल्या 5 महिन्यांपासून टीम इंडियाचा भाग नव्हता. त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात खेळण्याची संधी मिळत होती. अक्षर पटेलने अलीकडच्या काळात तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, अशा परिस्थितीत अक्षर पटेल कर्णधार रोहितची पहिली पसंती ठरू शकतो.

रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आशिया चषक 2022 मध्ये त्याला 2 सामने खेळल्यानंतरच वगळण्यात आले. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली आणि तेव्हापासून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होता. रवींद्र जडेजा हा भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने भारतासाठी 60 कसोटींमध्ये 24.71 च्या सरासरीने 242 विकेट घेतल्या आणि 3 शतकांसह 36.57 च्या सरासरीने 2523 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT