क्रीडा

Ind vs Aus Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ODI सामन्यातून बाहेर, मोठे कारण आले समोर

Kiran Mahanavar

India vs Australia Jasprit Bumrah ruled out of Indore ODI : भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे. जसप्रीत बुमराहला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही, तो त्याच्या कुटुंबीयांना भेटायला गेला आहे. त्यामुळेच इंदूर वनडे सामन्यादरम्यान तो ड्रेसिंग रूममध्येही दिसणार नाही. त्याच्या जागी मुकेश कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे.

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून लांब होता. संघात परतण्यापूर्वी तो गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता आणि त्यानंतर तो बाहेर पडला होता. वर्ल्डकपपूर्वी बुमराह तंदुरुस्त होईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती आणि असेच काहीसे घडले. त्याचे पुनरागमन आयर्लंड दौऱ्यावर झाले आणि त्यानंतर तो आशिया कपमध्येही खेळला आणि जबरदस्त गोलंदाजी केली.

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यात मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली होती, परंतु आता बुमराह दुसऱ्या वनडेत खेळणार नाही आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

बीसीसीआयने एक पोस्ट जारी करून म्हटले आहे की, जसप्रीत बुमराह दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघासोबत इंदूरला गेला नाही. तो त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेला असून त्याला एक छोटीशी विश्रांती देण्यात आली आहे. दुसऱ्या वनडेसाठी बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार संघात सामील झाला आहे.

जसप्रीत बुमराहने जेव्हापासून पुनरागमन केले आहे, तेव्हापासून भारतीय गोलंदाजी विभाग आक्रमक दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT