WTC Final IND vs AUS Playing XI  
क्रीडा

WTC Final IND vs AUS Playing XI : रोहित शर्माने नाही केली विराटसारखी चूक! टीम इंडियातून 4 खेळाडू बाहेर

Kiran Mahanavar

WTC Final IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळल्या जात आहे.

टीम इंडियाची ही सलग दुसरी फायनल आहे, तर कांगारू टीम पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळत आहे. रोहित शर्मासमोर भारतीय चाहत्यांना आयसीसी ट्रॉफीची 10 वर्षे वाट पाहण्याच्या आशा आहेत. त्याचबरोबर पॅट कमिन्सलाही त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पहिले मोठे विजेतेपद मिळवून द्यावेसे वाटेल.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप-2021 च्या विजेतेपदाच्या सामन्यात विराट कोहलीची चूक केली नाही. नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच रवींद्र जडेजाला संघात 4 वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटू म्हणून निवडले. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन या सामन्यात खेळत नाहीये. 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ 2 स्पिनर्ससह वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर उतरला, ज्यावर बरीच टीका झाली.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT