Virat-Rohit-Hug-1 
क्रीडा

Video: विराट पुढे निघाला पण मागून रोहितने हाक मारली अन्...

विराज भागवत

भारतीय क्रिकेट फॅन्समध्ये या व्हिडीओची तुफान चर्चा

Ind vs Eng 2nd Test: गोलंदाजांनी लॉर्ड्सच्या मैदानावर अप्रतिम मारा करत टीम इंडियाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. पाचव्या दिवशी आधी शमी-बुमराह जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव केवळ १२० धावांत आटोपला. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर विराट आणि रोहित यांच्यात मैदानावर एक गोष्ट घडली. ही गोष्ट व्हिडीओमध्ये कैद झाली असून त्या व्हिडीओची क्रिकेट फॅन्समध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

पाहा तो व्हिडीओ-

भारतीय गोलंदाजांनी पाचव्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीआधी इंग्लंडचे चार गडी बाद केले होते. पण कर्णधार जो रूट मैदानात होता. त्याने दोन सामन्यात दोन शतके झळकावल्यामुळे त्याला बाद करणं महत्त्वाचं होतं. चहापानानंतर लगेचच जो रूट झेलबाद झाला. तेव्हा विराट आणि रोहित यांनी आनंदाने एकमेकांची गळाभेट घेत विकेट सेलिब्रेट केली.

विराट-रोहितच्या गळाभेटीची चर्चा

कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद किंवा विसंवाद आहे अशा चर्चा २०१९च्या विश्वचषकापासून सुरू आहेत. यावर विराट, रोहित, कोच रवी शास्त्री आणि बीसीसीआय यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पण काही क्रिकेट जाणकार आणि फॅन्सच्या मते विराट आणि रोहित यांच्यात आलबेल नाही. अशा मताच्या लोकांसाठी कालचा सामना आणि व्हायरल झालेला व्हिडीओ म्हणजे एक प्रकारचे सणसणीत उत्तरच आहे असा सूर काल नेटकऱ्यांमध्ये दिसून आला.

पाहा काही निवडक ट्वीट्स-

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कर्णधारपदावरून विराट आणि रोहित यांच्यात वाद असल्याची चर्चा रंगली होती. विराटला कसोटीचे तर रोहितला निर्धारित षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद दिले जाईल अशा बातम्याही चालवल्या जात होत्या. पण या साऱ्या केवळ अफवाच असल्याचे अखेर समोर आले. तशातच, इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात घडलेला प्रसंग पाहता टीम इंडियामध्ये सारं काही आलबेलच आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET चा पेपर नेमका कसा फुटला? भिवंडीत काय घडलं? परीक्षा अचानक रद्द; राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आलं समोर

What is Gautam Adani Startup Initiative? फक्त मोठ्या शहरातच नाही, आता खेड्यापाड्यातील उद्योजकांनाही मिळणार अदानींचा पाठिंबा; काय आहे 'वंदे भारतम्' उपक्रम?

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला

आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

Bank News: 30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्र ने दिले मोठे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT