ENG vs IND Twitter
क्रीडा

VIDEO : मॅच दरम्यान टीम इंडियाची जर्सी घालून प्रेक्षकाची घुसखोरी

प्रेक्षकांमधून एक इंग्लिश मॅन भारतीय टीमची जर्सी घालून थेट मैदानात घुसल्याचे पाहायला मिळाले.

सुशांत जाधव

England vs India, 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लिश कर्णधार ज्यो रुटच्या दमदार शतकाच्या जोरावर यजमानांनी जबरदस्त कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. त्याला जॉनी बेयरस्टोने अर्धशतकी खेळी करुन सुरेख साथ दिली. दरम्यान ज्यो रुटच्या खेळीला ब्रेक लावण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना अपयश येत असताना एक अनोखा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षकांमधून एक इंग्लिश मॅन भारतीय टीमची जर्सी घालून थेट मैदानात घुसल्याचे पाहायला मिळाले. स्वत:ला इंडियन प्लेयर असल्याचा दावा तो करताना दिसला. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून बाहेर नेले. या सर्व प्रकारानंतर भारतीय ताफ्यात हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले.

जार्वो नावाचा व्यक्तीची चर्चा

भारतीय संघातील गोलंदाज इंग्लिश फलंदाजांना बाद करण्यात अपयशी ठरत असताना जार्वो नावाच्या व्यक्तीने मैदानात एन्ट्री मारली. भारतीय जर्सी घालून तो स्वत: खेळाडू असल्याचे सांगतानाही दिसला. सोशल मीडियावर या सर्व प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.

तिसऱ्या दिवसाच्या खेळात लंच ब्रेकनंतर भारतीय खेळाडू मैदानात उतरले. त्यावेळी इंग्लिश मॅन भारतीय ताफ्यासोबत मैदानात उतरल्याचा प्रकार घडला. भारतीय संघाची जर्सी घातलेली असल्यामुळे तो टीम इंडियाचा सदस्य असल्याचा भास झाला. पण तो 12 खेळाडू प्रेक्षकातून आल्याचे लक्षात आले. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ मैदानात येत या व्यक्तिला बाहेर नेले. हा प्रकार पाहून सिराजला हसू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. या मजेशीर घटनेशिवाय लॉर्ड्सच्या मैदानात प्रेक्षकांकडून आणखी एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. काही प्रेक्षकांनी लोकेश राहुलसोबत हुल्लडबाजी केली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही या घटनेवर नाराजी व्यक्त केली. क्रिकेटच्या पंढरीत दोन्ही संघात 'कांटे की टक्कर' पाहायला मिळत असताना घडलेल्या या घटनेच्या संदर्भात सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT