शास्त्री आणि टीमसमोर आता ‘फिट टू फ्लाय’ चाचणीचे आव्हान 
क्रीडा

शास्त्री आणि टीमसमोर आता ‘फिट टू फ्लाय’ चाचणीचे आव्हान

ब्रिटनच्या आरोग्य संदर्भातील नियमानुसार त्यांचे सीटी स्कोअर ३८ पेक्षा अधिक असायला हवा तरच त्यांना विमानातून प्रवास करण्याचे प्रमाणपत्र मिळू शकेल.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या उत्तरार्धात सर्वात चर्चेत राहिलेले आणि कोरोना बाधित झालेले मुख्य मार्गदर्शक रवी शास्त्री, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक भारत अरुण आणि श्रीधर या संसर्गातून मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत, परंतु भारतात परतण्यासाठी त्यांना `फिट टू फ्लाय` म्हणजेच प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेली तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागणार आहे.

ब्रिटनच्या आरोग्य नियमाप्रमाणे या तिघांचे १० दिवसांचे अलगीकरण पूर्ण झाले आहे, पण मायदेशी परतण्यासाठी त्यांना आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येण्याबरोबर फिट टू फ्लाय चाचणीही पार करावी लागणार आहे. शास्त्री, अरुण आणि श्रीधर यांची प्रकृती उत्तम आहे. कोरोनातून ते मुक्त झाले आहेत, त्यामुळे अलगीकरणातून बाहेर आले आहेत, परंतु ब्रिटनच्या आरोग्य संदर्भातील नियमानुसार त्यांचे सीटी स्कोअर ३८ पेक्षा अधिक असायला हवा तरच त्यांना विमानातून प्रवास करण्याचे प्रमाणपत्र मिळू शकेल. हा सीटी स्कोअर व्यवस्थित आला तर पुढच्या दोन दिवसांत ते मायदेशी रवाना होऊ शकतील, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या सिटी (सीटी स्कॅन) स्कोअरवरून कोरोना विषाणूने एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीवर किती परिणाम केला याचे निदान होते. चांगला सिटी स्कोअर असेल तर प्रवास करताना अडचणी येणार नाहीत. लंडन ते दिल्ली किंवा मुंबई हा विमान प्रवास मोठा आहे, त्यामुळे सिटी स्कोअर ४० पर्यंत असणे आवश्यक आहे, असे सांगण्यात येत आहे. शास्त्री आणि इतर दोघांना आता कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु तंदुरुस्ती प्रमाणपत्र गरजेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT