Pujara-Rahane 
क्रीडा

IND vs ENG: जोडी जबरदस्त! पुजारा-रहाणेने केली विक्रमी कामगिरी

विराज भागवत

चेतेश्वर पुजारा- अजिंक्य रहाणे जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं

Ind vs Eng 2nd Test: इंग्लंडने पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. भारताचा पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुल दुसऱ्या डावात ५ धावांवर बाद झाला. रोहितला चांगली सुरूवात मिळाली होती, पण हवाई फटका खेळण्याच्या नादात तोदेखील (२१) बाद झाला. कर्णधार विराट कोहलीकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या. पण विराटच्या (२०) पदरीही निराशाच आली. पण त्यानंतर मैदानात उभ्या ठाकलेल्या चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणे जोडीने मात्र शांत व संयमी खेळ करत विक्रमी कामगिरी केली. या दोघांनी चहापानाची वेळ होईपर्यंत संघाला शंभरी (३ बाद १०५) गाठून दिली.

रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली हे ती बडे फलंदाज अवघ्या ५५ धावांत माघारी परतले. मार्क वूडने २ तर करनने १ गडी टिपला. विराटच्या विकेटनंतर लंच ब्रेक झाला. उपाहानंतर चहापानापर्यंतचा काळ भारतीय फलंदाजांसाठी कसोटीचा होता. पण पुजारा आणि रहाणे या दोघांनी आपला अनुभव पणाला लावत अप्रतिम खेळ सादर केला. या दोघांनी ३० षटकांचे सत्र संपूर्णपणे खेळून काढले. या कालावधीत त्यांनी १५० चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. महत्त्वाची बाब म्हणजे, पुजारा-रहाणे यांची अर्धशतकी भागीदारी ही गेल्या २० वर्षात भारताने केलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात संथ गतीची अर्धशतकी भागीदारी ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामना वाचवताना आर अश्विन आणि हनुमा विहारी या दोघांनी चिवट खेळ दाखवत भारताकडून या दोघांपेक्षाही संथ गतीने अर्धशतकी भागीदारी रचली होती.

35 चेंडू खेळल्यावर पुजाराने उघडलं धावांचं खातं

कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळात सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. एका बाजूला विराट त्याच्या ढंगात खेळ करत होता तर दुसरीकडे संयमी पुजारा आपली लय सांभाळून होता. कोहली मैदानात असताना पुजाराने अत्यंत आरामात आपली पहिली धाव घेतली. पण त्या पहिल्या धावेसाठी त्याने तब्बल ३५ चेंडू खेळले. मजेची गोष्ट म्हणजे, शतक ठोकल्यावर लोक जसे टाळ्या वाजवतात, तशा टाळ्या पुजाराच्या पहिल्या धावेसाठी वाजल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT