Suryakumar Yadav's Catch IND vs NZ 
क्रीडा

IND vs NZ: फ्लाईंग सूर्या! ठरला स्लीपमधाला बाप माणूस

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav's Catch IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या.

प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला किवी संघ सुरुवातीपासूनच गुडघ्यावर दिसला. पाहुण्या संघाने पहिल्याच षटकात फिन ऍलनच्या रूपाने विकेट गमावली.

दुसऱ्या डावातील पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडची पहिली विकेट पडली. हार्दिक पांड्याने ही विकेट घेतली. कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवनेही या विकेटमध्ये योगदान दिले. सूर्याने स्लिपमध्ये फिन ऍलनचा झेल घेतला. सूर्याने हा झेल अप्रतिम पकडला. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा झेल घेण्यासाठी सूर्याने हवेत खूप उंच उडी मारल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. झेल घेतल्यानंतर तो जमिनीवर पडला.

विशेष म्हणजे या सामन्यात भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने शानदार शतकी खेळी खेळली. त्याने 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 126 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 होता. टी-20 मध्ये शतक झळकावण्यासोबतच तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा गिल विराट कोहलीनंतरचा भारताचा पाचवा फलंदाज ठरला. याशिवाय त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतीय संघासाठी सर्वोच्च धावसंख्या केली. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर 122* धावांचा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT