ind vs nz ishan kishan poor-batting-performance Career is over
ind vs nz ishan kishan poor-batting-performance Career is over sakal
क्रीडा

IND vs NZ: न्युझीलंडविरुद्ध टी-20 मालिका झाली अन् 'या' दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपली!

Kiran Mahanavar

India vs New Zealand 3rd T20 : तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने मालिका 2-1 अशी खिशात घातली. नाबाद 126 धावा करणाऱ्या शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचवेळी कर्णधार हार्दिक पंड्याला मालिकावीर ठरला.

मात्र तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात एका फ्लॉप खेळाडूने टीम इंडियाच्या आत्मविश्वासाला तडा दिला आहे. अशा परिस्थितीत या खेळाडूची टी-20 कारकीर्द अकाली संपुष्टात येऊ शकते. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने एका खेळाडूला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मोठ्या आत्मविश्वासाने टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली होती.

अनेक संधी वाया घालवणाऱ्या टीम इंडियाच्या या फ्लॉप खेळाडूची टी-20 कारकीर्द आता अडचणीत येताना दिसत आहे. खरे तर ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत, ईशान किशनला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली होती, परंतु या संपूर्ण टी-20 मध्ये ईशान किशन वाईटरित्या फ्लॉप राहिला. मालिका ईशान किशनला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तीन सामन्यांमध्ये केवळ 4, 19 आणि 1 धावा करता आल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ईशान किशनला केवळ 5, 8* आणि 17 धावा करता आल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतील इशान किशनच्या या अत्यंत फ्लॉप कामगिरीनंतर आता दोन्ही संघांमधील त्याचे स्थान जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेव्हा ऋषभ पंत किंवा केएल राहुल टीम इंडियात परततील, तेव्हा ईशान किशनला टीम इंडियातून बाहेर पडावे लागेल आणि त्यामुळे तो दीर्घकाळ टीम इंडियातून बाहेर राहू शकतो. ऋषभ पंत परत येईपर्यंत केएल राहुल टीम इंडियाचा पहिला पसंतीचा यष्टीरक्षक फलंदाज असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Chhetri : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने अचानक केली निवृत्तीची घोषणा

Jr NTR: ज्युनियर एनटीआरचं होतंय कौतुक; वाढदिवसाच्या आधी इतके पैसे मंदिराला केले दान

Unemployment Rate: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरांमधील बेरोजगारीचा दर वाढला; पण महिलांची स्थिती सुधारली

Virat Kohli On Retirement : 'माझं काम संपेल, मी निघून जाईन...' विराट कोहलीने निवृत्तीवर केलं मोठं विधान

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT